31 C
Mumbai
Monday, May 6, 2024
HomeराजकीयGujarat Vidhansabha Election: गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांची कन्या 'आप'मध्ये; निवडणुकीची रणधुमाळी रंगणार!

Gujarat Vidhansabha Election: गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांची कन्या ‘आप’मध्ये; निवडणुकीची रणधुमाळी रंगणार!

गुजरातचे माजी मुख्यमंत्री छबीलदास मेहता यांची कन्या नीता मेहता यांनी केजरीवाल यांची भेट घेतल्याच्या दुसऱ्या दिवशी 'आप' मध्ये प्रवेश केला. केजरीवाल हे शनिवार आणि रविवार दोन दिवस गुजरातच्या दौऱ्यावर होते. नीता मेहता म्हणाल्या की, दिल्लीमध्ये केजरीवाल सरकारने केलेली कामे आणि महागाई विरोधात त्यांची लढाई याकडे पाहून मी आम आदमी पक्षात प्रवेश केला.

गुजरात राज्यात डिसेंबर महिन्यात विधानसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपमध्ये अटीतटीची लढत झाली होती. तरी देखील भाजपने निवडणुक जिंकत सत्ता आपल्या ताब्यात कायम ठेवली. यंदा मात्र आम आदमी पक्ष देखील निवडणूकीच्या रिंगणात उतरला असून जोरदार प्रचार देखील सुरू केला आहे. त्यामुळे निवडणुकीची रणधुमाळी आता चांगलीच रंगणार आहे. आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देखील गुजरात निवडणुकीच्या प्रचारात सक्रीय झाले आहेत. दरम्यान काँग्रेसचे माजी नेता आणि गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलीने सोमवारी आम आदमी पक्षात प्रवेश केला.

गुजरातचे माजी मुख्यमंत्री छबीलदास मेहता यांची कन्या नीता मेहता यांनी केजरीवाल यांची भेट घेतल्याच्या दुसऱ्या दिवशी ‘आप’ मध्ये प्रवेश केला. केजरीवाल हे शनिवार आणि रविवार दोन दिवस गुजरातच्या दौऱ्यावर होते. नीता मेहता म्हणाल्या की, दिल्लीमध्ये केजरीवाल सरकारने केलेली कामे आणि महागाई विरोधात त्यांची लढाई याकडे पाहून मी आम आदमी पक्षात प्रवेश केला.

हे सुद्धा वाचा –

Healthcare Facility: राज्यात ७०० ठीकाणी सुरू होणार ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’!

Udyanraje Bhosale: रयत शिक्षण संस्थेचे नामांतर पवार शिक्षण संस्था करा; खासदार उदयनराजेंची जळजळीत टीका

Mumbai News : रेल्वे प्रवाशाच्या बॅगेत सापडला तब्बल 2 कोटींचा मुद्देमाल! रक्कम बघून आरपीएफही दंग

राज्याचे माजी गृहमंत्री प्रबोध रावल यांचा मुलगा आणि काँग्रेस नेता चेतन रावल यांनी शनिवारी पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ‘आप’मध्ये प्रवेश करत त्यांनी सांगितले की, केजरीवाल यांच्या जनतेप्रती केलेल्या कामांकडे पाहून मी प्रभावित झालो. तसेच राज्य आणि केंद्रात सत्तेत असलेला भाजप आणि काँग्रेस पक्ष लोकांच्या समस्या सोडविण्यात अपयशी ठरले आहेत.

तसेच दलित लेखक सुनील जडाव यांनी देखील आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. सन २०१७ मध्ये त्यांनी सरकारी पुरस्कार परत केला होत. जडाव म्हणाले की, सत्ताधारी पक्ष अस्पृष्यता नष्ट करण्यात असफल झाली आहे. राज्यात दलितांविरोधात अत्याचार वाढत असून त्याविरोधात कोणतीही कारवाई केली जात नाही आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी