30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रझोमॅटोचे CEO दीपंदर गोयल अडकले लग्नबंधनात; मॅक्सिकन मॉडेलसोबत घेतले सातफेरे

झोमॅटोचे CEO दीपंदर गोयल अडकले लग्नबंधनात; मॅक्सिकन मॉडेलसोबत घेतले सातफेरे

फूड डिलिव्हरी ॲप झोमॅटोचे संस्थापक दीपंदर गोयल(Zomato CEO Deepinder Goyal) विवाहबंधनात अडकल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी वयाच्या ४१ व्या वर्षी मॅक्सिकन मॉडेलसोबत आपला संसार थाटला असल्याचे समजले. ग्रेशिया मुनोझ असं या मॉडेलचं नाव आहे. मॉडेल ग्रेशिया मुनोझ ही २०२२ मध्ये अमेरिकेच्या मेट्रोपॉलिटन फॅशन वीकची विजेती आहे.(Zomato CEO Deepinder Goyal Marries Grecia Munoz)

मिळालेल्या माहितीनुसार, दीपंदर गोयल आणि ग्रेशिया फेब्रुवारीमध्ये त्यांच्या हनीमूनवरून परतले आहेत. गोयल यांचे हे दुसरे लग्न असल्याचे बोलले जात आहे. त्यांचे पहिले लग्न आयआयटी-दिल्ली मधील त्यांच्या क्लासमेट कांचन जोशीसोबत झाले होते.

उर्वशी रौतेला करणार राजकारणात एन्ट्री? लोकसभेचं मिळालं तिकीट

दोन दिवसांपूर्वी दीपंदर गोयल हे झोमॅटो ‘प्युअर व्हेज मोड’ आणि ‘प्युअर व्हेज फ्लीट’ वरून चर्चेत आले होते. तर आता लग्नामुळं चर्चेत आले आहेत.

तर कोण आहे ग्रेशिया मुनोझ?

ग्रेशिया मुनोज ही मेक्सिकोमध्ये जन्मलेली मॉडेल आहे. ती एक टेलिव्हिजन होस्ट देखील आहे. ती २०२२ मध्ये अमेरिकेतील मेट्रोपॉलिटन फॅशन वीकची विजेती ठरली आहे. ती सध्या भारतात असल्याची माहिती तिच्या काही इंस्टाग्राम पोस्टवरुन समजते.

‘राज’कीय भेटीत तेजस्विनी पंडीतने सांगितला, पुरंदरचा तह…; नेटकरी संतापले

जानेवारी महिन्यातही तिनं भारताचे अनेक फोटो शेअर केले होते. त्यामध्ये दिल्लीतील प्रसिद्ध पर्यटन स्थळांचे काही फोटो होते. सध्या तिनं इंस्टाग्रामवरील तिच्या बायोमध्ये भारतामधील घरी असल्याचा उल्लेख केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Grecia Muñoz (@greciamunozp)

दीपंदर गोयल यांच्याबद्दल सांगायचं झाल्यास…

४१ वर्षीय गोयल हे प्रसिद्ध फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोचे संस्थापक व सीईओ आहेत. २००८ मध्ये त्यांनी आपल्या राहत्या घरातूनच ही कंपनी सुरु केली होती व त्यावेळेस त्याचे नाव फूडीबे असे ठेवण्यात आले होते. सध्या झोमॅटोचा व्यवसाय हा भारतातील १००० हुन अधिक शहरांमध्ये पसरला आहे.

बहुचर्चित व प्रसिद्ध असा हा झोमॅटोचा प्लॅटफॉर्म अनेकदा वादात सुद्धा सापडला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी