31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीय'राज'कीय भेटीत तेजस्विनी पंडीतने सांगितला, पुरंदरचा तह…; नेटकरी संतापले

‘राज’कीय भेटीत तेजस्विनी पंडीतने सांगितला, पुरंदरचा तह…; नेटकरी संतापले

मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांच्या भेटीमुळं राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज ठाकरे आणि भाजप नेते यांच्यात भेटीगाठी सुरु असल्याचे पाहायाला मिळत आहे. अशातच मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडीत (Tejaswini Pandit) चर्चेत आली आहे. तेजस्विनीनं पुरंदरचा तह... पण राजावर विश्वास...कायम! असे ट्वीट करत शिवाजी महाराजांनी केलेल्या पुरंदरच्या तहाचे विश्लेष्ण करणाऱ्या लेखाचा एक भाग पोस्ट केला आहे. मात्र, तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) सोशल मीडियावर आपली राजकीय-सामाजिक मुद्यावरील भूमिका मांडत असते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांच्या भेटीमुळं राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज ठाकरे आणि भाजप नेते यांच्यात भेटीगाठी सुरु असल्याचे पाहायाला मिळत आहे. अशातच मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडीत (Tejaswini Pandit) चर्चेत आली आहे. तेजस्विनीनं पुरंदरचा तह… पण राजावर विश्वास…कायम! असे ट्वीट करत शिवाजी महाराजांनी केलेल्या पुरंदरच्या तहाचे विश्लेष्ण करणाऱ्या लेखाचा एक भाग पोस्ट केला आहे. मात्र, तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) सोशल मीडियावर आपली राजकीय-सामाजिक मुद्यावरील भूमिका मांडत असते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांची भेट घेतली. त्यामुळे मनसेदेखील महायुतीत सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर मुंबईत मध्यरात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे राज ठाकरे लवकरच भाजपसोबत जाणार या चर्चेला जोर आला. अशातच तेजस्विनी पंडीतने पुरंदरच्या तह शेअर केल्यामे नेटकऱ्यांनी छत्रपती शिवरायांची तुलना कोणासोबत करतेय? असा सवाल उपस्थित केला आहे.

काय म्हणाली तेजस्विनी पंडीत?

”या तहामुळे स्वराज्याचे तात्कालिक नुकसान नक्कीच झाले होते. त्यानंतर शिवाजी महाराजांना आग्रा येथे औरंगजेबाकडून कैद देखील झाली होती पण हा तह करताना शिवाजी महाराजांनी बरीच मोठी दूरदृष्टी दाखवली होती. जे २३ किल्ले तहामध्ये द्यायचे ठरले होते ते मुळतः मोगलांचेच किल्ले होते. तोरणा, राजगड, शिवनेरी सारखे महत्त्वाचे किल्ले शिवाजी महाराजांना राखून ठेवण्यात यश आले होते.

माढ्याच्या जागेसाठी शरद पवारांच्या मनातील उमेदवार कोण?

या तहामुळे सामान्य जनतेचे होणारे हाल थांबले होते. आग्रा येथील कैदेतून सुटल्यानंतर शिवाजी महाराजांनी आणि स्वराज्याच्या शिलेदारांनी परत एक एक किल्ला जिंकण्यास सुरुवात केली. हा तह १३ जून १६६५ रोजी झाला होता. आणि तह झाल्यानंतर महाराजांकडे १२ किल्ले उरले होते. पण पुढील १५ वर्षात म्हणजेच १६८० पर्यंत शिवाजी महाराजांकडे तब्बल २०० किल्ले होते.

केजरीवालांच्या अटकेनंतर शरद पवारांचे मोठं वक्तव्य…

हा तह जेवढा ऐतिहासिक आहे तेवढाच सामान्य माणसाला प्रेरणादायी पण आहे. बरेच वेळेस प्रचंड संघर्ष करून यशाचे शिखर गाठल्यावर तिथूनही माघार घेण्याची वेळ आयुष्यात अनेक जणावर येते पण अशी वेळ आल्यावर खचून न जाता परत कसे उभा राहायचे हे शिवाजी महाराजांकडून आणि या तहातून शिकायला मिळते. काही वेळेस स्वीकारलेली तात्कालिक माघार दूरदृष्टीचा विचार करता किती महत्त्वाची असते ही गोष्ट पण पुरंदरचा तह शिकवतो. शिवाजी महाराजांचा इतिहास प्रेरणादायी आहे तो याच कारणामुळे. या तहाच्या मूळ प्रती आजही राजस्थानातील बिकानेर येथील संग्रहालयात उपलब्ध आहेत.

नेटकरी संतापले?

तिच्या या पोस्टनंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. नाही पटलं… तुलना कोणासोबत ? तह नाही, ह्याला नांगी टाकणे म्हणतात असे एका युजरने म्हटले.

केजरीवाल जेलमधूनच सरकार चालवणार? कायदा काय सांगतो?

अहो ताई तुमच्या साहेबांच्या राजकारनाला आमच्या राज्याच्या निर्णय सोबत compare करू नका कुठे ते 1-2 लोकसभा जागेसाठी दिल्लीपुढे लोटांगण घालणारे तुमचे साहेब आणि कुठे शिवछत्रपती, असेही एका युजरने म्हटले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे दाखले देणं बंद करा.

माझ्या राजाने कोणाला लुबाडून खाल्लं नव्हतं.जेवढे आजकाल सत्तेत जात आहेत असेही एकाने म्हटले. तुलना कोणा सोबत करायची याची तरी लाज राखा असेही एकाने म्हटले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी