30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeराजकीय'मविआ'च्या अपयशाला ‘कोरोना‘चा उतारा

‘मविआ’च्या अपयशाला ‘कोरोना‘चा उतारा

टीम लय भारी

मुंबई : राज्यात सत्ता परिवर्तनाचं नाट्य रंगलंय. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे धाबे दणाणले आहेत. जनता देखील या परिवर्तन नात्याचा ‘आनंद‘ घेत आहे. हा एक मोठ्या पडद्यावरचा ‘चित्रपट‘ आपण पाहतो आहोत, असा भास प्रत्येकाला होत आहे. कारण या नाटकातील पात्र देखील साउथच्या कोणत्याही राजकीय गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या चित्रपटाला लाजवेल अशीच आहेत.

सरकार कोणत्याही क्षणी पडू शकते. परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. त्यात राज्याची सूत्रे राज्यपालांच्या हातात जाण्याची शक्यता असतांना ऐनवेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी सकाळीच प्रसिध्द झाली. त्यानंतर थोड्याच वेळात मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना कोरोनाची लागण झाल्याचे विधान कमलनाथ यांनी पत्रकार परिषदेत केले. त्यामुळे अपयश झाकण्यासाठी उध्दव ठाकरेंना कोरोना झाला का? असा प्रश्न सामान्य लोकांना पडल्याशिवाय राहणार नाही.

गेल्या दोन वर्षांपासून कोणतेही संकट आले की, मोठ्या नेत्यांना कोरोना होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यापूर्वी ईडीच्या चौकशीला सामोरे जातांना अनेकांनी कोरोनाचा आधार घेतला होता. नुकताच काॅंग्रेसच्या सोनिया गांधी आणि राहूल गांधींना देखील चौकशी दरम्यान कोरोनाची लागण झाली होती.

विधानभा बरखास्त होणार का ? मग पुढे काय होणार ? कधी होणार ? मुख्यमंत्री कोण होणार ? अशा एक ना अनेक प्रश्नांच्या उत्तरांची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. या परिस्थितीत राज्यात राष्ट्रपती राजवट सुरु होऊ शकते. या सर्व घटनांची जबाबदारी राज्यपालांच्या खांद्यावर येणार हे निश्चित झाले आहे. पावसाळी अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच, विधान परिषदेची निवडणूक जाहिर झाली आणि दुखावलेल्या एकनाथ शिंदेंनी स्व:पक्षाला खिंडीत गाठले. आणि ऐन मोक्याच्या वेळीच राज्यपालांना कोरानाने गाठले. आता पुढे काही क्षणांत सरकार कोसळले तर राज्याची जबाबदारी कोणाच्या खांद्यावर द्यायची, हा प्रश्न उपस्थित झाल्या शिवाय राहणार नाही.

राज्यपाल हे पद निपक्ष असते. मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी याला अपवाद आहेत. त्यांच्यावर वारंवार ते भाजप धर्जीणे असल्याचा ठपका ठेवला गेला आहे. त्यामुळे त्यांना हे अचानक आलेले आजारपण नक्कीच पथ्यावर पडले आहे. दोन दिवसांपासून राज्यात एक नाटक सुरु आहे. मात्र त्यांनी यावर कोणतेही भाष्य केलेले नाही.

‘मौनमं सर्वांथ साधकमं‘ ही भूमिका राज्यपालांप्रमाणेच राज्यातील मोठ्या नेत्यांनी घेतलेली आहे. अजूनपर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील या सरकारमधील नेत्यांनी कोणतेही भाष्य केले नाही. दोन दिवसांपासून सुरु असलेले हे नाट्य अत्यंत संवेदनशील बनले आहे.

हे सुद्धा वाचा :

सत्ता हातातून जात असताना ‘महाविकास आघाडी’ सुस्तचं

एकनाथ शिंदेंसह पळपुट्या आमदारांनी शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाशी केली प्रतारणा

सेनेच्या नव्या गटनेत्याला बंडखोर आमदारांचा विरोध

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी