27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमुंबईएकनाथ शिंदेंसह पळपुट्या आमदारांनी शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाशी केली प्रतारणा

एकनाथ शिंदेंसह पळपुट्या आमदारांनी शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाशी केली प्रतारणा

टीम लय भारी

मुंबई : ‘बाळासाहेब, आनंद दिघे व शिवसेनेशी प्रतारणा करणार नाही’ अशी लंगडी भूमिका ‘शिव’सेनेचे पळपुटे नेते एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे. पण शिंदे व त्यांच्या साथीदार आमदारांनी शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक कर्तृत्वासोबत प्रतारणा केली आहे. महाराष्ट्रातून पळ काढलेले एकनाथ शिंदे व सोबतचे आमदार सुरतमध्ये दोन दिवस लपून बसले होते. महाराष्ट्रासोबत सुरतचे ऐतिहासिक नाते आहे.

सुरत हे नाव जरी ऐकले तरी मराठी माणसांच्या नजरेसमोर शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास उभा राहतो. शिवकालात सुरत हे शहर औरंगजेबाच्या मुघली कार्यक्षेत्रात येत होते. सुरत हे मुघल राजवटीतील मोठे व्यापारी केंद्र होते. औरंगजेबाचा आर्थिक कणा मोडण्यासाठी शिवाजी महाराजांनी सुरतेवर छापा मारला होता. तेथील संपत्ती लुटून ती त्यांनी स्वराज्याच्या उभारणीसाठी लावली होती.
महाराष्ट्रातून सुरतमध्ये जावून शिवरायांच्या मावळ्यांनी मराठी साम्राज्याची ताकद दाखविली होती. त्याच सुरतमध्ये एकनाथ शिंदे व त्यांचे साथीदार बिळात लपून बसावे तसे दोन दिवस लपून राहिले.

आपण शिवसेनेत आहोत. शिवसेनेतून अद्याप बाहेर पडलेलो नाही, असे शिंदे यांच्याकडून सांगितले जात आहे. पण शिवाजी महाराजांच्या नावावरून स्थापन झालेल्या ‘शिव’सेनेचा बाणा ते विसरलेले दिसत आहेत. भविष्यात सुरत शहराचा उल्लेख होईल तेव्हा शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाबरोबरच एकनाथ शिंदेचा पळपुटेपणाचाही उल्लेख होईल, यापूर्वी छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे व राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली होती. पण कुणीही महाराष्ट्राबाहेर पळून गेले नव्हते. पण एकनाथ शिंदे यांनी पळपुटेपणाचे दर्शन घडवून महाराष्ट्राचे नाक कापल्याचे बोलले जात आहे.

हे सुद्धा वाचा : 

सेनेच्या नव्या गटनेत्याला बंडखोर आमदारांचा विरोध

सत्ता हातातून जात असताना ‘महाविकास आघाडी’ सुस्तचं

‘आमचे आमदार आमच्यासोबत’

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी