29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमंत्रालयEknath Shinde cabinet : मंत्रीपदासाठी धनगर समाजाकडून दोघे शर्यतीत, पण तूर्त दोघांनाही...

Eknath Shinde cabinet : मंत्रीपदासाठी धनगर समाजाकडून दोघे शर्यतीत, पण तूर्त दोघांनाही थांबावे लागणार !

मंत्रीमंडळ विस्ताराची लगीनघाई सुरू झाली आहे. कुणाला मंत्रीपदे मिळणार याबाबतची अनेकविध नावे बाहेर पडू लागली आहेत. मंत्रीमंडळ विस्तारात धनगर समाजालाही निश्चितपणे प्रतिनिधीत्व दिले जाईल, असे बोलले जात आहे.

मंत्रीमंडळ विस्ताराची लगीनघाई सुरू झाली आहे. कुणाला मंत्रीपदे मिळणार याबाबतची अनेकविध नावे बाहेर पडू लागली आहेत. मंत्रीमंडळ विस्तारात धनगर समाजालाही निश्चितपणे प्रतिनिधीत्व दिले जाईल, असे बोलले जात आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यातील ताईत असलेले दोन धनगर नेते मंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. या दोघांनाही मंत्रीपदे मिळू शकतील, अशी आशा धनगर समाजाला आहे. पंरतु लवकरच होऊ घातलेल्या मंत्रीमंडळाच्या विस्तारात या दोघांपैकी कोणालाच संधी मिळण्याची शक्यता नसल्याचे सूत्रांनी सांगितले.Eknath Shinde राम शिंदे व गोपीचंद पडळकर हे भाजपमधील धनगर समाजाचे मोठे चेहरे आहेत.

राम शिंदे हे फडणवीस यांच्या जुन्या टीममधील मानले जातात. देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांना नव्याने पुढे आणले आहे. विशेषतः गेल्या दोन वर्षात ‘महाविकास आघाडी’ सरकारवर बेधडक तोफा डागण्याचे काम गोपीचंद पडळकर करीत होते. भाजपमधील जुन्या जाणत्या व मातब्बर नेत्यांपेक्षाही पडळकर यांनी जनमाणसांमध्ये ताकद निर्माण केली आहे.

हे सुद्धा वाचा

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांनी स्वत:चाच निर्णय केला रद्द, शिवसेना आमदाराचे टीकास्त्र

Eknath Shinde Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्ताराची लगीनघाई सुरू

Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी केल्या ८ अधिकाऱ्यांच्या बदल्या

गोपीचंद पडळकर यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे सोशल मीडिया व प्रसारमाध्यमांमध्येही त्यांना जबरदस्त TRP आहे. त्यामुळे शिंदे व पडळकर या दोघांनाही फडणवीस यांच्याकडून मंत्रीपदे दिली जातील, अशी ठाम शक्यता व्यक्त केली जात आहे.

असे असले तरी पहिल्या टप्प्यात मात्र या दोघांनाही मंत्रीपदे दिली जाण्याची शक्यता नाही. पहिल्या टप्प्यात साधारण १५ जणांना मंत्रीपदे दिली जातील. यातील सात मंत्रीपदे एकनाथ शिंदे गटाला दिली जातील, तर आठ मंत्रीपदे भाजप गटाला दिली जातील. या आठजणांमध्ये भाजपच्या पहिल्या फळीतील नेत्यांना संधी मिळेल. त्यामुळे त्यात शिंदे – पडळकर यांची वर्णी लागण्याची शक्यता नाही, असे सूत्रांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी