29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमंत्रालयIAS Officer : शिंदे-फडणवीस सरकारने पहिल्यांदाच केल्या 'आयएएस' अध‍िकाऱ्यांच्या बदल्या

IAS Officer : शिंदे-फडणवीस सरकारने पहिल्यांदाच केल्या ‘आयएएस’ अध‍िकाऱ्यांच्या बदल्या

महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर प्रथमच आयएएस आधिकाऱ्यांच्या (IAS Officer)  बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यामध्ये दोन आयएएस महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ‍शिंदे सरकारने राज्यातील एकूण 44 आयएएस अध‍िकाऱ्यांच्या बदल्या केल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर प्रथमच आयएएस आधिकाऱ्यांच्या (IAS Officer)  बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यामध्ये दोन आयएएस महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ‍शिंदे सरकारने राज्यातील एकूण 44 आयएएस अध‍िकाऱ्यांच्या बदल्या केल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये नाश‍िक जिल्हा पर‍िषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोडे यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी आश‍िमा मित्तल पदभ‍ार स्विकारणार आहेत. तर लीना बनसोडे यांची ठाण्याच्या आदिवासी विकास विभागाच्या अतिर‍िक्त आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

आशिमा मित्तल या पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे आयटीडीपी प्रकल्प अधिकारी होत्या. या बदल्या करतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून या बदल्या केल्याची चर्चा सुरू आहे. आश‍िमा मित्तल या राजस्थानमधील जयपूर मधील आहेत. त्या तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. सिव्हिल इंजिनिअर आहेत. 2018 साली त्या आयएएस अधिकारी म्हणून रूजू झाल्या. त्यांचे पदव्युत्तर शिक्षण मानव वंशशास्त्र या विषयात झाले आहे.

हे सुद्धा वाचा

Repo Rate बापरे ! एका वर्षात चार वेळा वाढले रेपो रेट

Adhani : आदानींच्या कंपनीला मिळाले मोठे काम

Six Air Bags : सहा एअर बॅगचा निर्णय 1 वर्ष पुढे ढकलला

आयएएस (IAS Officer) हे सर्वांत मोठे अधिकाराचे पद आहे. त्याची एक वेगळी शक्ती आहे. त्याची एक गर‍िमा आहे. आयएएस परीक्षा पास होण्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो. कॅबिनेट सचिव, भारत सरकारचा सचिव तसेच मंत्रालयातील सचिव इत्यादी मोठी पदे आहेत. सिव्हिल सेवेमध्ये 24 सेवा बजावता येतात.

आयएफएस, आयपीएस आयआरएस ही ‘ए’ ग्रेडची पदे आहेत.  हा पदासाठी वयोमर्यांदा 32 असून, ओबीसींसाठी 35 तर एससी, एसटींसाठी 37 वर्ष वयोमर्यांदा असते. या साठी पदवीचे शिक्षण पूर्ण झालेले असायला हवे. आयएसआयचा फुल फॉर्म (Indian Administrative Service) असा आहे. म्हणजेच ‘भारतीय प्रशासकीय सेवा’ असा आहे. आयएएस बनण्यासाठी युपीएससी परिक्षा पास होणे गरजेचे असते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी