26 C
Mumbai
Sunday, August 7, 2022
घरसिनेमा६८ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर

६८ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर

टीम लय भारी

मुंबई : मनोरंजन क्षेत्रात सर्वांना उत्सुकता असलेले राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार घोषित करण्यात आलेले आहेत. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे यंदाचे हे ६८ वे वर्ष आहे. यंदाच्या वर्षी ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा म्हणून पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर हिंदी चित्रपटांमध्ये अभिनेता अजय देवगण याच्या ‘तान्हाजी – द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.

हिंदी, मराठी भाषेतील चित्रपटांसह राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये कन्नड, मणिपुरी, पंजाबी, तमिळ, तेलगू, हरियाणवी, छत्तीसगडी या भाषेतील चित्रपटांना सुद्धा नामांकने देण्यात येतात. ‘तान्हाजी’ या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये दोन पुरस्कार मिळाले आहेत. अभिनेता अजय देवगण याला या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

याव्यतिरिक्त चित्रपटांसाठी अनुकूल राज्य म्हणून मध्यप्रदेश, सर्वोत्कृष्ट गीतकार – मनोज मुन्तशिर, पार्श्वगायनासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार राहुल देशपांडे यांना घोषित करण्यात आला आहे. तसेच उल्लेखनीय फिचर फिल्म – जून (मराठी), गोदाकाठ (मराठी), अवांचित (मराठी), सर्वोत्कृष्ट बालकलाकार मराठी सिनेमा – अनिश गोसावी (टकटक), आकांक्षा पिंगळे, दिव्येश इंदुलकर (सुमी); सर्वोत्कृष्ट सामाजिक सिनेमा – फनरल (मराठी), सर्वोत्कृष्ट बालपट – सुमी, सर्वोत्कृष्ट साऊंड इंजिनिअर- अनमोल भावे (मी वसंतराव), सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शक – विशाल अय्यर (परीह), कौटुंबिक मूल्यांवर आधारित सर्वोत्तम चित्रपट नॉन-फिचर फिल्म श्रेणी – कुंकुमार्चन असे पुरस्कार यंदाच्या ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये(68th National Film Award) घोषित करण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा :

स्वतःच्या सुरक्षेसाठी सलमान खानने केला गन लायसन्ससाठी अर्ज

काॅंग्रसचे नेते निघाले ‘अतिवृष्टी’ दौऱ्यावर

द्रौपदी मुर्मूंची देशाच्या राष्ट्रपती पदी झालेली निवड हा ‘समस्त‘ स्त्रीशक्तीचा गौरव – अजित पवार

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!