29 C
Mumbai
Wednesday, July 3, 2024
Homeसिनेमाछोट्या पडद्यावर खलनायक साकारणाऱ्या अभिनेते अनुपम श्याम ओझा यांचे निधन

छोट्या पडद्यावर खलनायक साकारणाऱ्या अभिनेते अनुपम श्याम ओझा यांचे निधन

टीम लय भारी

मुंबई : छोट्या पडद्यावरील खलनायकाची भूमिका साकारणारे अनुपम श्याम ओझा यांचे रविवारी रात्री निधन झाले. एक अवयव निकामी झाल्यामुळे गोरेगावच्या लाईफ लाईन रुग्णालयात वयाच्या 64 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला (Actor Anupam Shyam Ojha passes away).

स्टार प्लस या लोकप्रिय हिंदू वाहिनी वर ‘मन की आवाज प्रतिज्ञा’ या मालिकेत खलनायकाची भूमिका साकारली होती. सज्जन सिंग ही खलनायकाची भूमिका बजावत ते अनेक लोकांच्या घरा घरात पोहचले आणि नंतर त्यांच्या ह्याच नावाने लोक त्यांना ओळखू लागले. प्रतिज्ञा 2 च्या नवीन पर्वात देखील ते हीच भूमिका साकारत होते. मूत्रपिंडाच्या आजारामुळे त्यांना आठवड्यातून 3 वेळा डायलिसिससाठी जावे लागत होते. जुलै महिन्यात डायलिसिसच्या वेळी ते कोसळल्यानंतर त्यांना गोरेगावच्या लाईफ लाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

‘बचपन का प्यार’ फेम मुलाची अभिनेत्यांना ही भूरळ; रेकॉर्डिंगसाठी लागली लाईन

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा मराठमोळा लूक, नऊ वारी साडीत दिसतेय झकास !

अनुपम श्याम ओझा यांचा जन्म 20 सप्टेंबर 1957 रोजी प्रतापगड, उत्तर प्रदेश येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव राधेश्याम ओझा तर छोटा भाऊ अनुराग ओझा आहे. त्यांच्या पत्नीचे नाव सावित्री श्याम ओझा हे आहे (His wife name is Savitri Shyam Ojha).

अनुपम यांनी शालेय शिक्षण जीआसी प्रतापगड हायस्कूल येथे केले. फरिदाबादच्या राम मनोहर लोहिया या विद्यापीठातून त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले. अभिनयाची कला जोपासण्यासाठी ते भारतेंदू अकॅडमी ऑफ ड्रामेटिक आर्ट्समध्ये सामील झाले. त्यांनतर, स्वतःचे अभिनय कौशल्य आणखीन निपुण करण्यासाठी त्यांनी दिल्लीचा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश केला.

जागतिक आदिवासी दिना निमित्त विधानसभा उपाध्यक्षांचा खास कार्यक्रम

Mann Ki Awaaz Pratigya actor Anupam Shyam dies due to multiple organ failure; Twitter filled with condolences

त्यांच्या छोट्या पडद्यावरील कौतुकास्पद कमासाठी ते नेहमीच ओळखले गेले. परंतु त्यांच्या स्लमडॉग मिलियनर, बंदित क्वीन दिल से, लगान, हजारों ख्वईशे ऐसी इत्यादी सिनेमाने मधून देखील दर्जेदार काम केले.

त्यांच्या या मृत्युनंतर त्यांचे मित्र, चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी ट्विट करत दुःख व्यक्त केले आहे. एक उत्कृष्ठ अभिनेत्या सोबत मी एक महान व्यक्ती देखील गमवला आहे. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून मला खूप दुःख झाले आहे. त्यांच्या जाण्याने चित्रपट आणि टीव्ही उद्योगाचे नुकसान झाले आहे. मी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.

Actor Anupam Shyam Ojha passes away
अनुपम श्याम ओझा

अभिनेते मनोज जोशी यांनीही ट्विटर वरून जेष्ठ अभिनेत्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे. आम्ही एक महान व्यक्तिमत्व गमावले आहे. त्याचे अत्यंत दुःख आम्हला झाले आहे. त्यांच्या कुटुंबीयांना व मित्रपरिवाराला माझी मनापासून संवेदना आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी