28 C
Mumbai
Thursday, August 4, 2022
घरसिनेमाअभिनेता शाहिद कपूर पत्नीला वैतागला

अभिनेता शाहिद कपूर पत्नीला वैतागला

टीम लय भारी

मुंबई : हिंदी चित्रपट सृष्टीतील ‘कबीर सिंग’ अर्थात शाहिद कपूर हा अभिनेता आपल्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असतो. तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेल्या शाहिद कपूरने लग्न केल्यानंतर तो बऱ्याच वेळा त्याची पत्नी मीरा राजपूत कपूरमुळे देखील चर्चेत राहिला आहे. पण आता त्याने त्याची बायको मीरा बद्दल एक गोष्ट सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. मीराच्या या गोष्टीला शाहिद कपूर वैतागला असल्याचे त्याने या पोस्टमधून सांगितले आहे.

शाहिद कपूर आणि मीरा राजपूत कपूर हे हिंदी चित्रपट सृष्टीतील एक आदर्श दाम्पत्य आहे. हे नेहमीच आपल्या दोन मुलांसह बाहेर दिसून येतात. मीरा आणि शाहिद यांची जोडी ही लोकांना देखील खूप आवडते. मीरा नेहमीच तिचा पत्नीचा तोरा गाजवत असते. पण तरी यांच्यामध्ये कायमच उत्तम केमिस्ट्री दिसून येते. दरम्यान, शाहिदने नुकताच त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटला एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्याने तो मीराच्या सतत फोन वापरण्याच्या सवयीला वैतागला असल्याचे सांगितले आहे.

https://www.instagram.com/reel/Cf3QHBqlccf/?utm_source=ig_web_copy_link

या व्हिडिओमध्ये शाहिद आणि त्याची पत्नी मीरा एका कारमध्ये असल्याचे दिसून येत आहेत. यावेळी मीरा सतत तिच्या फोनमध्ये काहीतरी पाहत असल्याचे दिसून येत आहे. याचवेळी शाहिद व्हिडीओ काढतो. पण त्याकडेही तिचे लक्ष जात नाही. म्हणून शाहिदने हा व्हिडीओ इंस्टाग्रामला पोस्ट केला आणि ‘बीवी के फोन से परेशान’ असे त्याने त्या व्हिडीओखाली लिहिले आहे.

शाहिदची पत्नी मीरा कपूर ही सुद्धा सोशल मीडियावर कायमच ऍक्टिव्ह असल्याचे दिसून येते. ती नेहमीच काही ना काही पोस्ट करत असते. तिच्या सोशल मीडिया अकाउंटला शाहिद कपूरसोबतचे फोटो कायमच पाहायला मिळतात. हे दोघे पती-पत्नी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असल्याने ते कायमच एकमेकांना ट्रोल करताना दिसून येतात.

हे सुद्धा वाचा :

मुंबईकरांनो समुद्र किनारी जाणे टाळा; महापालिका प्रशासनाच्या मुंबईकरांना सूचना

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरेंचे मनसैनिकांना पत्र

शिंदे गटात गेलेल्या बंडखोरांची शिवसेनेतून हकालपट्टी सुरूच

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!