31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
HomeसिनेमाAamir Khan : कोविड नियम मोडल्याने आमिर खान विरुद्ध पोलिसात तक्रार

Aamir Khan : कोविड नियम मोडल्याने आमिर खान विरुद्ध पोलिसात तक्रार

टीम लय भारी

गाझियाबाद : बॉलिवूडमधील मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खान (Aamir Khan) विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Complaint lodged against Aamir Khan for breaking Covid rules) भाजपचे आमदार नंद किशोर गुर्जर यांनी आमिरविरुद्ध पोलिसात तक्रार दिली आहे. आमिरवर शूटिंग दरम्यान कोविड प्रोटोकॉल मोडल्याचा आरोप करण्यात येत आहे.

आमिर त्याचा आगामी आणि बहुचर्चीत ‘लाल सिंह चढ्ढा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद जिल्ह्यात पार पडले. या दरम्यान आमिरने कोरोना काळात योग्य ती काळजी घेतली नसल्याचे भाजपचे आमदार नंद किशोर गुर्जर यांनी म्हटले आहे.

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अनेक चाहत्यांना आमिरला पाहण्यासाठी सेटवर प्रचंड गर्दी केल्याचे पाहायला मिळाले होते. आमिरने त्याला भेटायला आलेल्या चाहत्यांसोबत सेल्फी काढत त्याच्या सोबत गप्पा मारल्या. परंतु हे करत असतानाच त्याने कोरोना-कोविडचे प्रोटोकॉल म्हणजेच काही साधे नियम देखील पाळले नाहीत. आमिरने मास्क किंवा फेसशिल्डचा वापर न करताच चाहत्यांसोबत सेल्फी काढल्याने नंद किशोर गुर्जर यांनी आमिरवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.

या चित्रपटात अभिनेत्री करीना कपूरदेखील एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिने चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्याचे सांगितले होते. तसेच सेटवर चित्रीकरणादरम्यान आमिर खानला दुखापत झाली होती.

एका अॅक्शन सीनचे चित्रीकरण करताना आमिर खानला दुखापत झाली होती पण, त्यामुळे चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्यात आलेले नव्हते. आमिरवर उपचार करण्यात आले होते. ही फारशी गंभीर दुखापत नसल्यामुळे चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्यात आलेले नव्हते.

१९९४ साली प्रदर्शित झालेल्या ‘फॉरेस्ट गम्प’ या ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटावरुन ‘लालसिंग चड्ढा’ या चित्रपटाचे कथानक तयार करण्यात आले आहे. या चित्रपटात आमिर एक पंजाबी व्यक्तिरेखा साकारत आहे. हा चित्रपट २०२१ मध्ये नाताळला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वेत चंदन करत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी