31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रएमपीएससी नियुक्तीसाठी झालेल्या बैठकीचा निर्णय जाहीर, 15500 पदांची होणार भरती

एमपीएससी नियुक्तीसाठी झालेल्या बैठकीचा निर्णय जाहीर, 15500 पदांची होणार भरती

टीम लय भारी

मुंबई :- एमपीएससीच्या परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी आणि त्यांच्या नियुक्तीसाठी काल मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जी बैठक झाली तिचे निर्णय जाहीर झाले आहेत. एकूण 15,511 पदे भरण्यासाठी तयारी चालू झाली आहे (MPSC appointments announced).

गट ‘अ’ ते ‘क’ पर्यंतच्या सर्व पदांवर भरती करण्याची कार्यवाही लौकरात लौकर पूर्ण होईल. यातून सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्या पदभरतीच्या निर्बंधांतून सूट देण्यात आलेली आहे. अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. गट ‘अ’ ची 1,417 पदे गट ‘ब’ ची 8,031 पदे तसेच गट ‘क’ ची 3,063 पदे अशी एकूण 15,511 पदांवर नियुक्ती होईल.

एमपीएससीची 817 जागांची मागणी, महाविकास आघाडी सरकारने दिल्या फक्त इतक्या जागा…

एमपीएससी विद्यार्थ्यांना दिलासा, नियुक्ती संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भरवली बैठक

भरणे यांनी सांगितले की , या बैठकीत एमपीएससीने 817 जागांसाठी केलेल्या शिफारशीबाबतही चर्चा झाली आहे. तसेच एसईबीसीच्या जागांबाबत आम्ही विधी व न्याय विभागाचा अभिप्राय मागितला आहे. आज संध्याकाळपर्यंतच तो अभिप्राय येईल, असे सांगतानाच आयोगावर 31 जुलैपर्यंत सदस्यांची रिक्त पदे भरली जातील असेही भरणे यांनी सांगितले आहे (The vacancies will be filled by July 31 he said).

MPSC appointments announced
एमपीएससी

धनंजय मुंडे नावाचा झंझावात…!

https://english.lokmat.com/maharashtra/big-news-mega-recruitment-soon-for-15500-mpsc-vacanct-post/

मुलाखतींवर अवलंबून असलेली 4 पदे रिक्त आहेत, जी भरणे गरजेचे आहे, त्यासाठी 31 जुलै अखेर पर्यंत निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. याच बरोबर केरळ लोकसेवा आयोगाच्या प्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची सदस्य संख्या वाढवण्यासाठी विचार सुद्धा या बैठकीत झाला. यामुळे मुलाखत प्रक्रिया सुरळीत होऊ शकेल. याच वेळी पुढील वर्षीचे परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करणेबाबतही विचार झाला.

तसेच यूपीएससीच्या धर्तीवर राज्यात एमपीएससी च्या परीक्षांचे वेळापत्रक एक वर्ष आधी जाहीर करण्याची सूचनाही आजच्या बैठकीत अजित पवार यांनी एमपीएससीला दिल्याचे भरणे म्हणाले. कोरोना काळात वित्त विभागाने शासकीय भारतीवर बंदी आणली होती. ही पदे भरण्यासाठी ती बंदी काहीशी शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आले आहे. अशी माहिती भरणे यांनी दिली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी