32 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeराजकीयमुंबई उच्च न्यायालयाने मंत्री नवाब मलिक यांना खडे बोल सुनावले

मुंबई उच्च न्यायालयाने मंत्री नवाब मलिक यांना खडे बोल सुनावले

टीम लय भारी
मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना एनसीबीचे माजी झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्या वडिलांनी न्यायालयात दिलेल्या वचननाम्याचा “इच्छापूर्वक उल्लंघन” केल्याबद्दल अवमानाच्या कारवाईसाठी दाखल केलेल्या याचिकेला उत्तर देण्याचे निर्देश दिले.(Mumbai High Court slams Nawab Malik)

सरकारी अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्या अवमान याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे.

हे सुद्धा वाचा

अधिवेशनात केलेल्या घोषणा म्हणजे जुमलेबाजी ,नवाब मलिक

किरीट सोमय्या म्हणजे भाजपची आयटम गर्ल, नवाब मलिकांचे धक्कादायक वक्तव्य

पाताळयंत्री किरीट सोमय्यांना पोलिसांची नोटीस

After Nawab Malik’s Complaint, Licence of Bar Owned by Sameer Wankhede Cancelled on Grounds of ‘Fraud’

यावेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक  यांना उच्च न्यायालयाने चांगलेच सुनावले आहे. तुमच्याकडून बदनामीकारक विधान होत आहेत. ही बदनामी कुठेतरी थांबायला हवी. अन्यथा तुम्हाला बोलण्यास दिलेली सूटच काढून घ्यावी लागेल, असा स्पष्ट इशारा उच्च न्यायालयाने मंत्री मलिक यांना दिला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने मंत्री नवाब मलिक यांना IRS अधिकारी समीर वानखेडे यांच्या वडिलांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेला उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आला आहे.  आश्वासन देऊनही नवाब मलिक समीर वानखेडे आणि कुटुंबाविरोधात बदनामीकारक वक्तव्य करत असल्याचा आरोप वानखेडे यांच्या वडिलांनी केला आहे.

न्यायमूर्ती एसजे काथावाला आणि मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने निर्देश दिले की, “प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे, मलिक हे ज्ञानदेव वानखेडे यांची  बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. या बदनामीतून मलिक यांना काय साध्य करायचे आहे.  हे सतत चालू राहणे योग्य नाही, असे स्पष्ट शब्दात न्यायालयालाने मलिकांना बजावले आहे. मलिक हे वानखेडेच्या प्रकरणात  5 फेब्रुवारीपर्यंत मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी