29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
HomeमुंबईUday Samant :'ते' घोषणा न देणारे 15 आमदार शिंदे गटात येणार -...

Uday Samant :’ते’ घोषणा न देणारे 15 आमदार शिंदे गटात येणार – उदय सामंत

यावेळी विरोधी बाकावर बसलेल्यांपैकी 15 आमदारांनी घोषणा दिल्या नाही. ते मंत्री शिंदे गटात सामील होणार असल्याचा गौप्यस्फोट उदय सामंत यांनी केला. त्यामुळे सर्वांनाच आर्श्चयाचा धक्का बसला आहे.

आज विधानभवानांच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणा बाजी आणि राडा झाला. यावेळी विरोधी बाकावर बसलेल्या आमदारांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी केली. तर सत्ताधाऱ्यांनी देखील जोरदार नारे बाजी केली. यावेळी हातात घोषणांचे फलक देखील होते. हा सगळा गोंधळ अभूतपूर्व होता. यावेळी विरोधी बाकावर बसलेल्यांपैकी 15 आमदारांनी घोषणा दिल्या नाही. ते मंत्री शिंदे गटात सामील होणार असल्याचा गौप्यस्फोट उदय सामंत यांनी केला. त्यामुळे सर्वांनाच आर्श्चयाचा धक्का बसला आहे. आता हे मंत्री कोण आहेत ते तुम्ही शोध असे आव्हान उदय सामंत यांनी महाविकास आघाडीला केले आहे.

शिवसेनेतून एकनाथ शिंदे गटात गेलेल्यांना गद्दार म्हटले जाते आहे. यावरून उदय सामंत यांनी आक्रमक प्रतिक्रीया दिल्या आहेत. ‘कोणी आम्हाला गद्दार म्हणतंय तर कोणी बाडगे म्हणतयं’ अशी वैयक्तीक टीका केली जात आहे. ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्या सारखे बरेच जण शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यांची नावे मात्र सांगितली नाहीत. कारण नावे सांगितली तर त्रास होईल असेही ते यावेळी म्हणाले.

आज महाविकास आघाडी मधील नेते आणि शिंदे गटातील आमदार यांच्यामध्ये पायऱ्यांवर धक्काबुक्की झाली. त्यानंतर दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप केले. आम्ही आमचं काम चोख करतोय, जो कोणी आडवा येईल त्याला त्याच भाषेत उत्तर द‍िले जाईल असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

हे सुद्धा वाचा

Leopard : बिबट्याला घाबरुन 18 दिवसांपासून 22 शाळांना सरकारने लावले कुलूप

Ajit Pawar :’पन्नास खोके एकदम ओके’ या घोषणा विरोधकांना झोंबल्या- अजित पवार

Maharashtra Monsoon Session 2022 : शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले झाले आक्रमक

पण आमचे घरेचे हे घरचे नाहीत का ? तुम्ही वैयक्तीक बोलणे योग्य आहे का ? आज ‘बंडगुजा’ हा नवीन शब्द प्रयोग केला तो योग्य नाही असे देखील ते यावेळी म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी