28.1 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमुंबईलोकल प्रवासाला परवानगी द्या नाहीतर, 5 हजार प्रवासभत्ता द्या, केशव उपाध्येंची मागणी

लोकल प्रवासाला परवानगी द्या नाहीतर, 5 हजार प्रवासभत्ता द्या, केशव उपाध्येंची मागणी

टीम लय भारी

मुंबई :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. यात मुख्य म्हणजे रेल्वेसेवा सर्वसामान्यांसाठी बंद आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे खूप हाल होत आहेत. राज्य सरकारने एकतर सर्वसामान्यांसाठी रेल्वेसेवा सुरू कराव्यात नाहीतर प्रवास भत्त्यापोटी दर महिना ५ हजार रुपये द्यावेत अशी मागणी भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे (Allow local travel Keshav Upadhyay demand).

कोरोनामुळे रेल्वेसेवा बंद केल्याने सामान्य जनतेला प्रवास करण्यास अतिशय त्रास सहन करावा लागत आहे. तसेच वाहतूक करण्यासाठी सामान्य जनतेचे अधिक पैसे जात आहेत. आधीच कोरोनामुळे उत्पन्न घटलेल्या वर्गाचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. राज्य सरकारने एकतर सर्वसामान्यांसाठी रेल्वेसेवा सुरू कराव्यात नाहीतर प्रवास भत्त्यापोटी दर महिना ५ हजार रुपये द्यावेत असे केशव उपाध्ये म्हणाले आहेत.

नाना पटोलेंचा आरोप राष्ट्रवादीने फेटाळला

पंकजा मुंडे घेणार नाराज समर्थक आणि पदाधिकाऱ्यांची भेट

राज्य सरकारने मुंबई व उपनगरातील सर्वसामान्य माणसाला लोकल प्रवासाची तत्काळ परवानगी द्यावी अन्यथा सर्वसामान्य माणसाला प्रवास भत्त्यापोटी दरमहा ५ हजार रुपये द्यावेत अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केशव उपाध्ये बोलत होते (Keshav Upadhyay was speaking at a press conference held at the BJP state office).

राज्य सरकारने गेली दीड वर्षे सर्वसामान्य जनतेसाठी उपनगरी रेल्वे सेवा बंद ठेवली आहे. त्यामुळे नोकरदार, तसेच रोजगारासाठी बाहेर पडणाऱ्या कष्टकरी जनतेची प्रचंड गैरसोय होत आहे. या वर्गाला प्रवासापोटी मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे. अन्य वाहनांनी प्रवास करण्यासाठी भरमसाठ खर्च तर होतो त्याचबरोबर वेळेचाही अपव्यय होतो. कोरोनामुळे उत्पन्न घटलेल्या वर्गाचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.

Allow local travel Keshav Upadhyay demand

केशव उपाध्येंआदित्य ठाकरेंचा महत्वकांक्षी उपक्रम, राज्यातील सगळे किल्ले होणार देखणे

BJP asks Maha govt to restore local trains in Mumbai or pay Rs 5,000 as allowance to individuals

मुंबईतील प्रवासी खासगी वाहतूकदारांच्या दावणीला बांधण्याचा हा डाव आहे अशी शंका सामान्य माणसाला येऊ लागली आहे. मुंबई, ठाणे परिसरातील जनतेने आजवर शिवसेनेला भरभरून साथ दिली आहे. या सर्वसामान्य जनतेची महाआघाडी सरकारला जाणीवच नसल्याचे चित्र दिसत आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच उपनगरी रेल्वे प्रवास बंद असल्याने याची भरपाई राज्य सरकारनेच देण्याची गरज आहे, असेही त्यांनी नमूद केले.

लस खरेदीसाठी राज्य सरकारने सात हजार कोटी रुपये राखून ठेवले असल्याचे मुख्यमंत्र्यांनीच सांगितले होते. हे सात हजार कोटी सामान्य माणसाला प्रवास भत्ता म्हणून द्यावेत व सामान्य माणसाच्या संतापाचा उद्रेक टाळावा, असेही केशव उपाध्ये यांनी सांगितले (Keshav Upadhyay also said that outbursts of anger of common man should be avoided).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी