35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeराजकीयजामखेडमध्ये भाजपच्या 40 पदाधिकाऱ्यांनी दिले तडकाफडकी राजीनामे

जामखेडमध्ये भाजपच्या 40 पदाधिकाऱ्यांनी दिले तडकाफडकी राजीनामे

टीम लय भारी

जामखेड :-  बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात स्थान न मिळाल्याने चिडलेल्या मुंडे समर्थकांनी राज्यभरात राजीनामे देण्याचा धडाका लावला आहे. बीडपासुन सुरू झालेले राजीनामास्त्राचे लोण आता जामखेड तालुक्यात धडकले आहे. सोमवारी भाजपच्या 40 पेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे यांच्याकडे सोपवल्याने भाजपच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे (In Jamkhed, 40 BJP office bearers resigned abruptly).

अहमदनगरच्या जामखेड तालुक्यात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. मुंडेप्रेमी कार्यकर्ते आणि नेत्यांनी मुंडे भगिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी भाजपा प्रदेशउपाध्यक्ष तथा माजी मंत्री राम शिंदे व भाजपाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे यांच्या उपस्थितीत जामखेडमध्ये भाजपची कार्यकर्ता बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुंडे समर्थक कार्यकर्त्यांनी पक्षाच्या पदाचे सामुहिक राजीनामे जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे यांच्याकडे जामखेडमध्ये सोपवले (Pro-Munde activists hand over party resignations to district president Arun Munde in Jamkhed).

पंकजा मुंडे घेणार नाराज समर्थक आणि पदाधिकाऱ्यांची भेट

मुंडे भगिनी पक्षावर नाराज असलेल्या चर्चेला पंकजाताई मुंडे यांनी पूर्णविराम लावला

मुंडे भगिनी केंद्रीय भाजपवर नाराज नाहीत; उगाच त्यांना बदनाम करू नका; देवेंद्र फडणवीस

Day after Rajpura incident: Now, BJP leaders ‘held hostage’ in Bathinda DC office, scale wall to leave

Jamkhed BJP office bearers resigned abruptly
भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

या समर्थकांनी दिले राजीनामे

पंचायत समिती सदस्य भगवान मुरूमकर, भाजपा विधी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अॅड प्रविण सानप, ओबीसी सेल जिल्हा कार्यकारणी सदस्य बाजीराव गोपाळघरे, ओबीसी सेल जिल्हा सरचिटणीस काशीनाथ ओमासे, तालुका उपाध्यक्ष वैजीनाथ पाटील, संतोष पवार, नानासाहेब गोपाळघरे, अनिल लोखंडे, डॉ. सोपान गोपाळघरे, दिपाली गर्जे महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा दिपाली गर्जे, राजेंद्र ओमासे, उध्दव हुलगुंडे, बाळासाहेब गोपाळघरे, नवनाथ गोपाळघरे, बाळासाहेब गीते, नागनाथ मुरूमकर, महारूद्र महारनवर, मच्छिंद्र गीते, पांडुरंग गर्जे, ईश्वर मुरूमकर, शिवाजी गीते, अशोक महारनवर, हर्षल बांगर, रोहिदास गीते, कविता मनोज राजगुरू भाजपा उपाध्यक्ष, निलावती मच्छिंद्र गीते, संदिप गीते, राहुल ढाळे, सुनिल रंधवे, बाळू दराडे, रंगनाथ गिरी, संतोष माने, मनोज राजगुरू, गहिनीनाथ गीते, अशोक गीते, राजकुमार गोसावी, संदिप जायभाय, एकनाथ गोपाळघरे, अशोक गोपाळघरे, भरत होडशीळ, भागवत सुरवसे, सुभाष जायभाय, सागर सोनवणे, तानाजी फुंदे या सर्वांनी राजीनाम दिले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी