33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमुंबईखासदार राहुल शेवाळेंना ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल

खासदार राहुल शेवाळेंना ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल

टीम लय भारी

मुंबई : नेत्यांना धमकावून, त्यांना ब्लॅकमेल करून, त्यांच्या नावाचा गैरवापर करून पैसे मिळविणे या राजकारणात घडणाऱ्या गोष्टी काही नव्या नाहीत. पण अशा महिलांवरनंतर कारवाई करण्यात येते आणि या महिला आपल्या बाईपणाचा फायदा घेत काहीही बरळू लागतात. अशाच प्रकारे दक्षिण – मध्य मुंबईचे खासदार असलेल्या राहुल शेवाळे यांच्या नावाची बदनामी करणाऱ्या महिलेविरोधात मुंबईच्या साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर महिला ही खंडणी वसूल करण्याच्या उद्देशाने खासदार राहुल शेवाळे यांची प्रतिमा मलिन करणे, त्यांना धमकावणे, त्यांना ब्लॅकमेल करणे अशी कामे करत होती. या गोष्टीला त्रस्त झालेल्या खासदार शेवाळे यांनी १२ मे रोजी अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात सदर महिलेविरोधात दाद मागितली होती. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानंतर सदर महिलेविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

‘गेल्या वर्षभरापासून खोट्या आरोपांमुळे मी आणि माझ्या कुटुंबीयांना मोठ्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. माझी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील प्रतिमा मलिन करण्यासाठी जाणीवपूर्वक रचलेले हे षडयंत्र असल्याने या प्रकरणाचा पर्दाफाश लवकरच करेन, असे मी याआधीच्या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले होते. त्यानुसार माझी बाजू न्यायालयापुढे मांडली आणि अखेर साकीनाका पोलीस ठाण्यात सदर महीलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सत्याचा विजय आहे. यापुढे पोलीस कायद्यानुसार योग्य ती कारवाई करतील याची मला खात्री आहे.’ असे मत खासदार राहुल शेवाळे यांनी व्यक्त केले आहे.

हे सुद्धा वाचा :

Big Breaking : शिंदे – फडणवीस यांचे दोन सदस्यांचे मंत्रीमंडळ घटनाबाह्य !

तुकाराम मुंडेंना मुंबई मनपाच्या आयुक्तपदी घेण्याची मागणी

नामांतरणाच्या मुद्द्याला भाजप-शिंदे सरकारने दिली मंजुरी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी