33 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
HomeमुंबईCorona Vaccine : भारतामध्ये लसीचा पहिला डोस कुणाला ?

Corona Vaccine : भारतामध्ये लसीचा पहिला डोस कुणाला ?

टीम लय भारी 

मुंबई : ब्रिटनमध्ये नव्या कोरोनाचा प्रकार आढळून आल्यानंतर तेथील सरकारने ऑक्सफोर्डच्या लसीला (Corona Vaccine ) आपत्कालीन मान्यता दिली आहे. त्यानंतर आता भारत सुद्धा सीरम इन्स्टिट्युटमध्ये विकसित होत असलेल्या ऑक्सफोर्डच्या लसीला आज मान्यता मिळण्याची शक्यता आहे. लसीकरणास परवानगी देताना अमेरिकेचे नवे अध्यक्ष जो बायडन, रशियाचे अध्यक्ष वाल्दिमीर पुतीन व इंग्लडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लस टोचून घेतली. मात्र, भारतात राष्ट्रपती रामनाथ कोविंद अथवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लसीचा पहिला डोस देण्याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून गुप्तता पाळण्यात येत आहे.

केंद्र सरकारमध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान किंवा मंत्रिमंडळातील मंत्र्यांना लस देण्याबाबत कोणत्याही प्रकारची चर्चा नाही. लसीला मंजुरी दिल्यानंतर पहिल्यांदा लस कोणाला टोचावी यावर विचार करता येईल, अशी माहिती आरोग्य मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. आवश्यक सर्व निकष पूर्ण केल्यावर लसीला परवानगी दिली जाईल, असेही ते म्हणाले. तर केंद्रीय मंत्रिमंडळातील मराठी मंत्र्यांच्या कार्यालयाकडून लसीबद्दल माहिती देण्यास नकार दिला.

लसीची घोषणा आज?

‘नववर्षात काही तरी आपल्या हाती पडू शकेल, इतकेच मी आपल्याला सूचित करु शकतो,’ असे विधान औषध महानियंत्रक डॉ. व्ही. जी सोमाणी यांनी गुरुवारी केले. देशात लसीच्या

मान्यतेसाठी केंद्रीय औषध मानक नियंत्रक संस्थेच्या तज्ज्ञ समितीच्या शुक्रवारच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे विधान महत्वाचे मानले जाते.

लसीकरणाच्या खोट्या जाहिरातींना रोखा – याचिका दाखल

कोरोनास प्रतिबंध करणाऱ्या खोट्या, बनावट जाहिराती, संकेतस्थळ, व्हाॅट्सएप मेसेजमुळे सरकारच्या चिंतेत भर पडली असून, त्याने सामान्य नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक होण्याची भीती आहे. त्याच पार्श्वभूमीवर अशा मेसेज, संकेतस्थळावर बंदी घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी