32 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमुंबईडॉ. बाबासाहेब आणि रमाई यांच्या लग्नाचा आज जल्लोष

डॉ. बाबासाहेब आणि रमाई यांच्या लग्नाचा आज जल्लोष

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई यांच्या लग्नाचा आज 117 व वाढदिवस आहे. या निमित्तानं बाबासाहेब यांचं जिथं लग्न झालं त्या भायखळा मार्केट मध्ये जल्लोषचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच दक्षिण मुंबई बौद्ध सेवा संघाने आयोजन केलं असून कार्यक्रमाला डॉ बाबासाहेब यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या पत्नी मनीषा आनंद राज आंबेडकर, आमदार यामिनी जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहणार आहेत.

डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई यांचं लग्न 4 एप्रिल 1906 रोजी झालं. रमाईचे नातेवाईक भायखळा येथे रहायला होते. त्यामुळे त्याच परिसरात लग्न लावायचं ठरलं. यानंतर मग भायखळाच्या मच्छी मार्केटच्या आवारात लग्न लावायचं ठरलं. ठरल्या प्रमाणे नियोजित स्थळी लग्न झालं. लग्नाला अनेकजण हजर होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे दुर्मिळ फोटो

या घटनेला आज 117 वर्ष झालीत. मात्र, महामानव यांच्या उपस्थितीत पावन झालेल्या भायखळा बाजारात गेल्या काही वर्षां पासून बाबासाहेब आणि रमाई यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला जात आहे. हा कार्यक्रम दक्षिण मुंबई बौद्ध सेवा संघाचे अध्यक्ष भगवान तांबे, सरचिटणीस अनुराधा साळवे आणि खजिनदार मोहन मर्चंडे हे आयोजित करत असतात. या ठिकाणी देखावा उभारला जात असतो. बाबासाहेब यांच्या लग्ना च्या वेळच वातावरण निर्माण केलं जातं असत. यावेळी संविधान चषक पारितोषिक वितरण केलं जाणार आहे.या कार्यक्रमाला हजारो लोक उपस्थित राहत असतात.

हे सुद्धा वाचा: 

भायखळा हबीब मार्केटमध्ये बाबासाहेब यांचं स्मारक व्हावं; ज्येष्ठ लेखक जयराम पवार यांची मागणी

आंबेडकरवादी नेते जोगेंद्र कवाडे एकनाथ शिंदे यांच्या कळपात; आता महाराष्ट्रभर घेणार सभा

Exclusive : मंगलप्रभात लोढा परदेशी अधिकाऱ्याला म्हणाले; तुम्हाला शिवाजी महाराज, डॉ. आंबेडकर माहित आहेत का ?

Dr. Babasaheb and Ramai 117 Marriage anniversary celebration, Dr. Babasaheb Ambedkar

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी