33 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeक्राईमपोलिस बदल्या : मि. क्लीन गृहमंत्री फडणवीस पुन्हा तोंडघशी

पोलिस बदल्या : मि. क्लीन गृहमंत्री फडणवीस पुन्हा तोंडघशी

आज पुन्हा एकदा पोलिस बदल्या आदेश निघाले. हे आदेश म्हणजे 8 पैकी 4 आधीच्या बदल्या रद्द आणि 4 जणांची आधीची पोस्टिंग बदलून नव्या जागी बदली दिली गेली आहे. गृहखात्यात पोलिस बदल्यांमधील घोळ आणि झोल सुरूच असल्याने मि. क्लीन म्हणवून घेतले जाणारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा तोंडघशी पडल्याचे दिसत आहे. आजचा घोळ विनंती बदल्यांमधील आहे.

आज पुन्हा एकदा पोलिस बदल्या आदेश निघाले. हे आदेश म्हणजे 8 पैकी 4 आधीच्या बदल्या रद्द आणि 4 जणांची आधीची पोस्टिंग बदलून नव्या जागी बदली दिली गेली आहे. गृहखात्यात पोलिस बदल्यांमधील घोळ आणि झोल सुरूच असल्याने मि. क्लीन म्हणवून घेतले जाणारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा तोंडघशी पडल्याचे दिसत आहे. आजचा घोळ विनंती बदल्यांमधील आहे.

महाराष्ट्र पोलीस राजपत्र, विभागीय, भाग-6अ करिता या अंतर्गत हे बदली आदेश जारी करण्यात आले आहेत. क्र.पोमसं/3/10/6/विनंती बदली- मुंबई शहर/16/2023 या क्रमांकाने हे आदेश आहेत. महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय, शहीद भगत सिंह मार्ग, कुलाबा, मुंबई येथून दिनांक 27/03/2023 रोजी हे बदली आदेश जारी केले गेले आहेत.

 

आदेश क्र.पोमसं/3/10/6/ विनंती बदल्या-पोनि/254/2021, दि. 17/12/2021 आणि आदेश क्र.पोमसं/3/10/6/पो. नि. बदल्या- 2022/36 दि.15/12/2022 असे याच कार्यालयाचे आधीचे आदेश फिरवून, रद्द करून आजचा नवा आदेश काढला गेला आहे.

 

महाराष्ट्र पोलीस कायदा-1951, कलम-22 न (2) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून, पोलीस आस्थापना मंडळ क्र. 2 यांनी दिलेल्या मान्यतेनुसार, निःशस्त्र पोलीस निरीक्षक यांच्या बदलीबाबत त्यांच्या विनंतीनुसार, हा बदली करण्याचा / बदली रद्द करण्याचा निर्णय घेतला गेल्याचे आजच्या आदेशात म्हटले आहे.

 

मुंबई शहरचे नागिन बाळू काळे आणि रमेश पांडुरंग यादव या दोघांची यापूर्वी 15 डिसेंबर 2022 व 17 डिसेंबर 2021 रोजीच्या आदेशाने, महामार्ग सुरक्षा पथक येथे बदली करण्यात आली होती. आता आधीचे आदेश रद्द करून या दोघांना तूर्तास मुंबई शहर कर्तव्यातच ठेवण्यात आले आहे. मुंबई शहरचे कैलास विठ्ठल बोंद्रे आणि अशोक श्रीधर उगले यांचीही अनुक्रमे ठाणे व नाशिकमध्ये केलेली बदली रद्द करण्यात आली आहे.

 

पुणे शहरचे मुरलीधर गंगाधर करपे यांची गुन्हे अन्वेषण विभागात केलेली बदली फिरवून त्यांना मुंबई शहरात नियुक्ती दिली गेली आहे.

 

दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) दौलत आबाजी साळवे, दयानंद बड्डा नायक आणि ज्ञानेश्वर रायभाग वाघ या तिघांना आधीचा दहशतवाद विरोधी पथकातील आदेश फिरवून मुंबई शहरमध्ये बदली देण्यात आली आहे.

 

हे सुध्दा वाचा :

पोलिस अधिकारी बदल्यांचा घोळ सुरूच; गृह विभागाने तीन दिवसात फिरवला आदेश!

हृदयस्पर्शी: IPS लेकीने केला DGP वडिलांना सॅल्यूट; व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल

कुचकामी फडणवीसांपेक्षा बच्चू कडूंना गृहमंत्री करा; सुषमा अंधारे यांची टीका

 

हे बदली आदेश तात्काळ प्रभावाने लागू करण्याचे अपर पोलीस महासंचालक (आस्थापना) संजीव कुमार सिंघल यांनी पोलीस महासंचालक यांचेकरिता काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.

 

Police Transfrers, Mr Clean, Home Minister Devendra Fadanvis Failed Again, Mr Clean Home Minister, Home Minister Devendra Fadanvis

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी