31 C
Mumbai
Wednesday, July 3, 2024
Homeमुंबईआधी रिपोर्ट पॉझिटिव्ह, मरणानंतर निगेटिव्ह, दोष नेमका कुणाचा

आधी रिपोर्ट पॉझिटिव्ह, मरणानंतर निगेटिव्ह, दोष नेमका कुणाचा

टीम लय भारी

मुंबई : महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाटत आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुंबईत दररोज हजारो लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहेत. दरम्यान, कोविड केंद्राच्या निष्काळजीपणामुळे एका महिलेला तिचा जीव गमवावा लागला आहे.

सर्व मिडीयात फेक निगेटिव्ह रिपोर्ट दिले जात असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यावरुन असे वाटते की हे सरकार पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आकडेवारी कमी दाखवण्यासाठी अधिकाऱ्यांना निगेटिव्ह रिपोर्ट द्यायला सांगत आहे का? असा प्रश्न पडतो. यासंदर्भात भाजपा आमदार योगेश सागर यांनी ट्विट द्वारे संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.

दरम्यान फक्त लॅबवालेच नाहीत तर फेक रिपोर्ट देण्यात या महापालिका अधिकाऱ्यांचाही हात असल्याचा संशय आता व्यक्त केला जात आहे. त्यांनी ट्विट द्वारे फेक रिपोर्ट च्या संदर्भात चौकशी करण्याची मागणी केली आहे.

मृत्यू आधीचा कोरोना अहवाल

आधी रिपोर्ट पॉझिटिव्ह, मरणानंतर निगेटिव्ह, दोष नेमका कुणाचा

अहवालावरील मृत्यूनंतरची तारीख

आधी रिपोर्ट पॉझिटिव्ह, मरणानंतर निगेटिव्ह, दोष नेमका कुणाचा

कांदिवली येथील डहाणूकरवाडी येथे राहणाऱ्या राजेश्वरी राजेश सावंत यांना ९ एप्रिल रोजी त्यांच्या अचानक पोटात दुखू लागले म्हणून त्यांनी फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेतला, तेव्हा डॉक्टर म्हणाले की, राजेश्वरीची ऑक्सिजन पातळी खूप कमी आहे, तुम्ही कोविडची चाचणी करून घ्या. १० एप्रिल रोजी राजेश सावंत यांनी कंट्रोल रूममध्ये फोन केला असता तेथून रूग्णाविषयीची सर्व माहिती देण्यास सांगितले. श्वास घेण्यास अडचण आल्यामुळे त्यांनी साई नगरात ऍन्टीजेन चाचणी केली, त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. परंतु कुटूंबातील डॉक्टरांच्या सांगण्यावरून त्यांनी आरटी पीसीआर चाचणी केली, त्याचा रिपोर्ट येण्यास दीड दिवस लागतो.

१० एप्रिलला आर दक्षिण वॉर्ड मधून राजेश सावंत यांना फोन आला की तुमचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे, आम्ही आमचे वाहन तुमच्या घराच्या इथे पाठवत आहोत. तुम्ही रूग्णा सोबत बीकेसी कोविड सेंटरमध्ये जा. त्यांनी एकत्र पत्र लिहिले आणि त्यामुळे राजेश्वरी यांना बीकेसी कोविड केंद्रात दाखल केले. सायंकाळी ४.४५ च्या सुमारास राजेश्वरी यांना बीकेसी कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. रात्री दहाच्या सुमारास राजेश सावंत यांनी आपल्या पत्नीला फोन केला असता त्यांनी सांगितले की येथे कोणी योग्य प्रकारे काळजी घेत नाही. पाणी देईला देखील कोणी येत नाही. जेव्हा राजेश सावंत यांनी बीकेसी कोविड सेंटरमध्ये फोन केला आणि विचारले की त्यांचे उपचार अद्याप सुरू झालेले नाहीत? तर त्यांनी उत्तर दिले की डॉक्टर अजून आले नाहीत, म्हणून त्यांना औषधे दिली गेली नाहीत. आम्ही येथे काळजी घेत आहोत त्यांची तुम्ही काळजी करू नका असेही त्यांना सांगण्यात आले.

दुसऱ्या दिवशी सकाळी राजेश सावंत यांनी त्यांच्या पत्नीला फोन केला असता त्या म्हणाले की,  उपचार अद्याप सुरू केले नाहीत. कोणत्याही प्रकारचे औषधही दिले नव्हते. मला श्वास घेण्यास त्रास होत आहे. १३ एप्रिलला व्हिडीओ कॉलवर राजेश्वरीची अवस्था पाहून राजेश सावंत यांनी बीकेसी कोविड सेंटरमधून त्याचा डिस्चार्ज घेतला आणि त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला.

राजेश्वरी यांना त्याच दिवशी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टर म्हणाले की कोविड पॉझिटिव्ह रिपोर्ट घेतल्यानंतरच आम्ही रेमेडिसिव्हिर इंजेक्शन रुग्णाला देऊ शकतो. बीकेसी कोविड सेंटरकडून रिपोर्ट मागितला असता ते म्हणाले की रिपोर्ट नाही आहे, तुम्हाला तो तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवला जाईल. काही वेळेनंतर जेव्हा पुन्हा रिपोर्ट मागितला तेव्हा ते म्हणाले की, आम्ही बघतो आहोत, तुम्हाला उद्या मिळेल.

राजेश्वरी यांना तो पर्यंत मालाडमधील सरस्वती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती खालावली होती. श्वास घेण्यास त्यांना त्रास होत होता. सीटी स्कॅन किंवा कोविडची चाचणी पुन्हा करणे कठीण होते. कोरोना रिपोर्टची वाट बघता बघता राजेश्वरी यांनी १४ एप्रिल रोजी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

राजेश्वरी यांचे पती राजेश यांनी पत्नीचा आरटीपीसीआर रिपोर्ट मिळवला. ज्यात १० एप्रिल, २०२१ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास स्वॅब घेऊन नंतर सकाळी १० वाजता कांदिवलीच्या साईनगरमध्ये जाऊन त्यांनी स्वॅबचा नमुना दिला. राजेश यांना मिळालेल्या रिपोर्ट मध्ये रजिस्ट्रेशनची वेळ ३ वाजून ३३ मिनिटे, स्वॅब कलेक्शनची वेळ ३ वाजून ३९ मिनिटे, तर रिपोर्ट हा ११ एप्रिल, २०२१ रोजी दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांचा असल्याचे दाखविण्यात आले आहे.

राजेश यांना स्वॅब कलेक्शन वेळेबाबत संशय आल्याने त्यांनी कोरोना चाचणी रिपोर्टवर असलेला ‘क्यूआर’ कोड स्कॅन केला. तेव्हा त्यात राजेश्वरी यांच्या नावे १५ एप्रिल २०२१ रोजी तयार करण्यात आलेला दुसरा अहवाल त्यांना सापडला. ज्यात रजिस्ट्रेशनची तारीख १५/०४/२०२१ आणि वेळ १२ वाजून ३३ मिनिटे, स्वॅब कलेक्शन, १२ वाजून ३४ मिनिटे, आणि रिपोर्ट १२ वाजून ३५ मिनिटे, अशी दुपारची वेळ आहे. म्हणजे अवघ्या तीन मिनिटांतच त्या कोविड निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे. शिवाय त्या १४ एप्रिलला रात्री त्यांचे निधन झाले आणि त्यांचा अंत्यविधी ही करण्यात आला. परंतु स्वॅब कलेक्शन अंत्यविधीनंतरचा दाखविण्यात आल्याने लॅबच्या कारभारावर राजेश यांनी संशय व्यक्त केला आहे.

मी या प्रकरणी लॅबच्या डॉक्टराशी संपर्क साधला तेव्हा आपण रिपोर्ट डाऊनलोड करतो त्या दिवशीची तारीख त्यात रिफ्लेक्ट होते, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले, दरम्यान, या प्रकरणी मी माझ्या वरिष्ठांशी चर्चा करत आहे.

विशाल देमुख, सहायक आरोग्य अधिकारी, आर. दक्षिण विभाग

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी