28 C
Mumbai
Saturday, August 6, 2022
घरमुंबईशिंदे सरकारने घेतला 'अधिकाऱ्यांच्या' बदल्यांचा निर्णय

शिंदे सरकारने घेतला ‘अधिकाऱ्यांच्या’ बदल्यांचा निर्णय

टीम लय भारी

मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का दिला आहे. मंत्रालयात विविध ठिकाणच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या तसेच इतर ठिकाणी नियुक्त्या केल्या जात आहेत. मुंबईतील मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह (सेवा) यांना या पदावरून दूर केले आहे. त्यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. तो हटविण्यात आला आहे. तर त्यांच्या जागी डॉ. बी. ए. गगराणी यांना या पदावर नेमण्यात आले आहे. अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह यांना आता दुसरी जबाबदारी देण्यात येत आहे.

शिंदे सरकारने घेतला 'अधिकाऱ्यांच्या' बदल्यांचा निर्णय

दरम्यान, आधीच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय रद्दबातल करण्याचा धडाका एकनाथ शिंदेंनी लावल्याच्या चर्चाही आता सुरू झाल्या आहेत.अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी यासंबंधी बी. ए.गगराणी यांना बदली संबंधी पत्र पाठवले आहे. आशिष कुमार सिंह यांच्या जागी त्यांची बदली करण्यात आली आहे. यासोबतच अपर मुख्य सचिव (1 )नगर विकास विभाग, मराठी भाषा विभाग आणि जलसंपदा विभाग या पदांचे अतिरिक्त कार्यभारही पुढील आदेश येईपर्यंत गगराणी यांच्याकडेच राहणार असल्याचा उल्लेख पत्रात उल्लेख करण्यात आला आहे. नितीन गद्रे यांनी हे पत्र डॉ. बी. ए. गगराणी यांना पाठवले आहे.

हे सुध्दा वाचा:

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!