30 C
Mumbai
Saturday, August 6, 2022
घरमहाराष्ट्रकल्याणमधील जखमी शिवसेना पदाधिकाऱ्याला उद्धव ठाकरेंनी केला फोन

कल्याणमधील जखमी शिवसेना पदाधिकाऱ्याला उद्धव ठाकरेंनी केला फोन

टीम लय भारी

कल्याण : आज बुधवारी (दि. १९ जुलै २०२२) सकाळी कल्याण पूर्व येथील संतोषी माता परिसरात कल्याणचे उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे यांच्यावर तीन ते चार जणांकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये हर्षवर्धन पालांडे यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. सदर हल्ला हा माजी नगरसेवक आणि शिंदे समर्थक महेश गायकवाड यांच्या सहकाऱ्यांनी केल्याचे पालांडे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, या घटनेनंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हर्षवर्धन पालांडे यांच्याशी फोनवरून संवाद (Uddhav Thackeray called the injured Shiv Sena office bearer in Kalyan) साधला आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पालांडे यांच्या तब्येतीची चौकशी करून ‘या गोष्टीचा वचपा नंतर काढू, काळजी करू नका.. तुम्ही एकदम व्यवस्थित व्हा, मी येईन भेटायला’ असा धीर दिला आहे. त्यामुळे कल्याणमधील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सध्या राज्यात उद्धव ठाकरे समर्थक विरुद्ध एकनाथ शिंदे समर्थक हा वाद चिघळताना दिसत आहे. मंत्री असो वा कार्यकर्ते सर्वच खालच्या पातळीवर जाऊन एकमेकांवर टीका करताना दिसत आहे. नाशिकमध्ये शिवसेना कार्यकर्त्यावर हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच आजच्या कल्याणमधील घटनेने उद्धव ठाकरे समर्थकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

पण उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे यांनी केलेल्या आरोपांचे माजी नगरसेवक आणि शिंदे समर्थक महेश गायकवाड यांनी खंडन केले आहे. सदर घटना दुर्दैवी आहे. पण याच्याशी माझा काडीमात्र संबंध नाही असेही महेश गायकवाड यांच्याकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, सदर घटनेचा तपास कोळशेवाडी पोलिसांकडून करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा :

कल्याण उपशहर प्रमुखावर शिंदे समर्थकाचा हल्ला

पुन्हा घात! नाशकात शिवसेना पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला

शिवसेनेतील बंडखोरांनी ‘पक्षघटनेला‘च फासला हरताळ

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!