35 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमुंबईएसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर अडचणीत आलेल्या गुणरत्न सदावर्ते यांचं जेलमध्ये उपोषण

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर अडचणीत आलेल्या गुणरत्न सदावर्ते यांचं जेलमध्ये उपोषण

टीम लय भारी

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर अडचणीत आलेले वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte)  हे सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे.  तिथे त्यांनी जेवण न करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील माहिती सरकारी वकील अरुणा पै यांनी माहिती दिली. (Gunaratna Sadavarte’s fast in jail)

गेल्या 15 दिवसांपासून सदावर्ते जेवत नसून, ते ज्या ज्या पोलीस ठाण्यात होते, तिथले पोलीस त्यांना जेवणासाठी विनंती करत होते. मात्र, सदावर्तेंनी जेवण करण्यास नकार देत सकाळी आणि सायंकाळी केवळ ज्यूस पित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

तत्पूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना जामीन मिळाला आहे. मात्र, इतर गुन्ह्यांमधून त्यांची सुटका झालेली नाही. दरम्यान, सदावर्ते यांची रवानगी पुन्हा एकदा आर्थर रोड जेलमध्ये करण्यात आली आहे. दरम्यान, सदावर्ते यांच्याविरोधात राज्यभरात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. आत्तापर्यंत गावदेवी, सातारा, कोल्हापूर पोलिसांनी सदावर्तेंची कोठडी घेतली होती.(Gunaratna Sadavarte’s fast in jail)


हे सुद्धा वाचा :

एसटी कामगारांकडून घेतलेल्या पैशाप्रकरणी सदाभाऊ खोत आणि पडळकरांचीही चौकशी करा : अतुल लोंढे

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

दिपाली सय्यद यांच्याकडून नवनीत राणांना कानपिचक्या

गुणरत्न सदावर्ते डुप्लिकेट बुद्धिस्ट

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी