27 C
Mumbai
Sunday, April 14, 2024
Homeमुंबईसुश्मिता सेनला हृदयविकाराचा झटका ; राजीव सेनची भावुक पोस्ट

सुश्मिता सेनला हृदयविकाराचा झटका ; राजीव सेनची भावुक पोस्ट

दिलखेचक अदा आणि आपल्या सौंदर्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी हिंदी सिनेसृष्टील अभनेत्री सुश्मिता सेन हिला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका येऊन गेला. सुडौल बांध्यासाठी नियमित व्यायाम, योगाभ्यास करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये सुश्मिता सेन आघाडीवर आहे. याबाबतची बरीच छायाचित्रे आणि व्हिडीओ तिने समाज माध्यमांवर प्रसिद्ध केली आहेत. नियमित व्यायाम करणाऱ्या लोकांनां हृदयविकाराचा आजार जडण्याची शक्यता कमी असते असा आतापर्यंत सर्वसामान्यांमध्ये समज होता. पण नियमित योगाभ्यास करणाऱ्या सुश्मिता सेनला हृदयविकाराचा झटका आल्याने हा केवळ गैरसमज असल्याचे पाहायला मिळत आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तिला रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं. तसेच तिची अँजिओप्लास्टीदेखील करण्यात आली. (Heart attack to Sushmita Sen)

Heart attack to Sushmita Sen

या घटनेमुळे तिच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे. तिला आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला चाहते देत आहेत. त्यातच तिचा भाऊ राजीव सेन याने बहिणीसाठी भावूक पोस्ट शेअर केली आहे. सुश्मिता सेन हिचा भाऊ राजीव सेन याने सुश्मितासोबत छायाचित्र शेअर केले आहे. यात तो म्हणाला, “माझी खंबीर बहीण. भाऊ तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम करतो”. वाहिनीवरील प्रेम या छायाचित्रांद्वारे त्याने व्यक्त केले आहे. सुश्मिता सेनची प्रकृती आता स्थिर आहे. तिने आपल्या चाहत्यांचे तसेच या कठीण प्रसंगात तिला साथ देणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत. सुश्मिताने तिच्या वडिलांबरोबरचा फोटो शेअर करत ही माहिती दिली.

हे सुद्धा वाचा

Vedio : येऊरच्या जंगलात २४ तास मिळतेय दारू आणि बाई ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्याचा बिहार झालाय!

VEDIO : संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला का झाला? विधिमंडळातही उमटले पडसाद

कसबा पोटनिवडणुकीच्या निकालाने हुरळून जाऊ नका; शिंदेचा मविआला टोला

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी