29 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeमुंबईसंसदरत्न श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त 'मावळरत्न' पुरस्काराचे वितरण

संसदरत्न श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘मावळरत्न’ पुरस्काराचे वितरण

पुणे जिल्ह्यातील मावळचे लोकप्रिय संसदरत्न खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पुणेकरांना मावळ रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यावेळी माहिती अधिकार महासंघ महाराष्ट्र राज्याचे सदस्य प्रदीप नाईक यांना सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मावळरत्न समाजभूषण पुरस्कार देण्यात आल्याचे वृत्त आहे. तळेगाव दाभाडेचे जनसेवा विकास समिती संस्थापक तथा अध्यक्ष, किशोर आवरे यांच्या माध्यमातून नाईक यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. (Maval Ratna Award)

संसदीय कामकाजात उत्कृष्ट कामगिरीनिमित्त श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांची ओळख आहे. संसदरत्न, महासंसदरत्न, संसद विशिष्ट रत्न पुरस्कार अशा अनेक पुरस्काराने गौरविल्यानंतर यंदा त्यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड गावातून समजकार्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नागरिकांसाठी त्यांनी मावळरत्न पुरस्काराचे आयोजन केले होते. पिंपरी-चिंचवडकरांसाठी ही एक प्रकारची शाबासकी आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात 16 फेब्रुवारी रोजी पुरस्कार सोहळ्याचे वितरण पार पडले.

त्याचप्रमाणे, प्रदीप नाईक यांच्या आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी तळेगाव तसेच आसपासच्या परिसरातील विविध मुद्यांवर प्रकाश टाकले. त्यांनी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत अनेकांना मदत केली आहे. याबरोबरच विद्यार्थी तसेच नागरिकांमध्ये माहिती अधिकार कायदा काय आहे. त्याचा आपण कसा वापर करु शकतो, याबद्दल मार्गदर्शन शिबिर घेतले. या पुरस्कारासाठी खास प्रदीप नाईक यांची निवड केली गेली. याप्रसंगी नाईक यांनी सहकारी मिलिंद अच्युत, कल्पेश भगत त्याचप्रमाणे संपूर्ण जनसेवा विकास समिती तळेगाव दाभाडे यांचे आभार मानले आहेत. त्याचप्रमाणे, सामाजिक कार्य व माहिती अधिकार कायद्याच्या माध्यमातून मी समाजाला न्याय देण्याचे काम यापुढे चालू ठेवणार, अशा भावना नाईक यांनी व्यक्त केल्या आहेत.

संसदरत्न श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त 'मावळरत्न' पुरस्काराचे वितरण

हा पुरस्कार प्रदान करताना व्यासपीठावर संसदरत्न श्रीरंग बारणे, माजी राज्य मंत्री अर्जुन खोतकर तसेच कामगार आघाडी संघटनेचे बाळासाहेबांची शिवसेना अध्यक्ष इरफान भाई सय्यद व नाईक यांचे मार्गदर्शक किशोर आवारे व भाजप ज्येष्ठनेते बाळासाहेब नेवाळे उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा:

निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर!

‘लय भारी’चे व्यवस्थापकीय संपादक तुषार खरात यांना यशवंत रत्न पुरस्कार

सेंट्रल व्हिस्टा : भारताच्या नवीन संसद भवन इमारतीची एक्स्ल्युझिव्ह छायाचित्रे 

20 जणांना मावळरत्न बहाल..
अमित गोरखे यांना शिक्षण रत्न, मुकुंद कुचेकर यांना समाजभूषण, डॉ. पं. नंदकिशोर कपोते यांना कला गौरव, सुर्यकांत मूथियान- पर्यावरण भूषण, वसंत काटे- उद्योगरत्न, माया रणवरे- दुर्गारत्न, डॉ. नारायण सुरवसे- सेवाभूषण, प्रा. सुनिता नवले – दुर्गारत्न, विजयन – शिक्षणरत्न, शेखर कुटे – वारकरी भूषण, संगीता तरडे – दुर्गारत्न, अमरसिंह निकम – आरोग्य भूषण, वृशाली मरळ- आधारभूषण, संतोष कनसे- श्रमिक भूषण, आलम शेख, भगवान मुळे – समाजभूषण, जयदेव म्हमाणे -क्रीडारत्न, प्रदीप नाईक-समाजभूषण, अनिल साळुंखे-समाजरत्न आणि शुंभकर को हौसिंग सोसायटीला आदर्श भूषण सोसायटी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी