31 C
Mumbai
Monday, September 5, 2022
घरमुंबईMilk Rate Increases : बाप्पाच्या सणाला 'महागाई'चे नैवेद्य, दुधाच्या दरात पुन्हा वाढ

Milk Rate Increases : बाप्पाच्या सणाला ‘महागाई’चे नैवेद्य, दुधाच्या दरात पुन्हा वाढ

दूध उत्पादकांनी ऐन गणेशोत्सवाच्या काळातच दूध दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय इतर मुलभूत वस्तूंचे सुद्धा दर वाढल्याते पाहायला मिळत आहे, त्यामुळे या प्रचंड महागाईत सण साजरे करायचे कसे असा प्रश्नच आता सर्वसामान्यांना पडला आहे. 

गणेशोत्सवाचा सण तोंडावर आला असताना सुद्धा सर्वसामान्यांची महागाईपासून सूटका होताना काही दिसत नाही. काही दिवसांपूर्वीच अमूल, मदर डेअरी, गोकूळ अशा दूध कंपन्यांनी दरवाढ केली होती. या दरवाढीनंतर मुंबईत सूटे दूध सुद्धा महागणार आहे. सदरच्या किंमतीत सात रुपयांची वाढ करून सूटे दूध मिळणार आहे, त्यामुळे बऱ्याच जणांचे महिन्याचे आर्थिक नियोजन चांगलेच कोलमडणार आहे. या सूट्या दुधाची दरवाढ येत्या 1 सप्टेंबर पासून लागू करण्यात येणार आहे. या दरवाढीनंतर सात रुपये अधिकचे मोजावे लागणार असून एक लिटर दुधामागे ग्राहकांना आता 80 रुपये मोजावे लागणार आहे. सदर नवी दरवाढ ही  28 फेब्रुवारी 2023  पर्यंत लागू करण्यात येणार आहे.

गेल्या काहीच दिवसांपूर्वी अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात वाढ केली होती, त्याआधी गोकुळने सुद्धा दर वाढवले होते. अमूल, मदर डेअरी, गोकूळ या सगळ्या कंपन्यांकडून दूध दरात प्रत्येकी २ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे, मात्र सूट्या दुधात तब्बल सात रुपयांनी वाढ केल्याने ग्राहकांना सुद्धा प्रश्न पडला आहे, कारण याचा थेट फटका खिशाला बसणार आहे. शिवाय आता गणेशोत्सवाचा सण सुद्धा तोंडावर असल्याने प्रसाद, नैवेद्य, वेगवेगळे गोडाचे पदार्थ बनवण्यासाठी दुधाची जास्त गरज लागणार असल्याने अनेकांची आता पंचाईतच झाली आहे.

हे सुद्धा वाचा…

Ashtavinayak : लेण्याद्रीचा गिरजात्मक गणेश ‘सहावा’ विनायक

Ganeshotsav 2022 : गणेशोत्सव नियोजनाच्या बैठकीत गावकऱ्यांचा राडा, तंटामुक्तीचे वाजले तीनतेरा

Shivsena Vs Shindesena : ‘धनुष्यबाण’ ही निशाणी शिंदे गटालाच मिळणार, शिंदे गटाचे ठाम मत

दूधदरवाढीचे कारण सांगताना जनावरांच्या चाऱ्याचा खर्च, हरभरा सारख्या चाऱ्याचे दर सुद्धा वाढल्याने त्याचा थेट फटका दूध उत्पादकांना बसत आहे. या सगळ्याच कारणांमुळे दूध उत्पादकांनी ऐन गणेशोत्सवाच्या काळातच दूध दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान दूधाबरोबरच इतरही जीवनावश्यक वस्तूंमध्ये कमालीची दरवाढ झाल्याचे दिसून येत आहे त्यामुळे या प्रचंड महागाईत सण साजरे करायचे कसे असा प्रश्नच आता सर्वसामान्यांना पडला आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी