29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeराजकीयउद्धव ठाकरेंना मिलिंद नार्वेकर म्हणाले :  प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, प्रसाद लाड...

उद्धव ठाकरेंना मिलिंद नार्वेकर म्हणाले :  प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, प्रसाद लाड यांना शिवबंधन बांधूया

टीम लय भारी

मुंबई :-  सध्या शिवसेना व भाजपचे नेते एकमेकांवर जोरदार चिखलफेक करीत आहेत. पण या कलुषित झालेल्या वातावरणातही सेना–भाजपच्या नेत्यांमधील सुसंवादाचा अनोखा धागा पाहायला मिळाला (Milind Narvekar says to Uddhav Thackeray).

‘विधीमंडळ कामकाज सल्लागार समिती’ची बैठक मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. ही बैठक आटोपून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या गाडीतून जायला निघाले. त्यावेळी समोरून प्रवीण दरेकर, गिरीश महाजन व प्रसाद लाड हे भाजपचे नेते आले. या तिघांना पाहून उद्धव ठाकरे यांनी आपली गाडी थांबविली.

Milind Narvekar says to Uddhav Thackeray
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

काँग्रेसला पक्ष विस्तार करण्याचा हक्क, पण राष्ट्रवादी – शिवसेना एकत्र राहील

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या लग्नाचा आज वाढदिवस, लेकीने जाहीर केले माता पित्यांचे तरूण वयातील फोटो

मुख्यमंत्री भाजपच्या या तिन्ही नेत्यांसोबत मनमोकळ्या गप्पा मारत होते. तेवढ्यात मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर तिथे पोचले. ‘या तिघांनी तुम्हाला घेराव तर घातला नाही ना ?’ अशा शब्दांत नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे मस्करीत विचारले (Milind Narvekar says to Uddhav Thackeray).

या तिघांना शिवबंधन बांधून टाकू, असाही चिमटा नार्वेकर यांनी काढला. त्यावर ‘आम्ही शिवसेनेते येऊ शकतो. तेच आमचे मूळ आहे’, असे उत्तर प्रवीण दरेकर यांनी दिले.

गोपीचंद पडळकर यांना राष्ट्रवादीचा इशारा; पवारांवर बोलाल तर ‘प्रसाद’ मिळेल

Mahrashtra CM Uddhav Thackeray stays allotment of 100 MHADA flats to Tata cancer hospital

प्रवीण दरेकरांच्या राजकारणाची सुरूवात शिवसेनेतूनच झाली होती. राज ठाकरे यांच्या बरोबर भारतीय विद्यार्थी सेनेत दरेकर सक्रीय होते. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले, अन् त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली (Milind Narvekar says to Uddhav Thackeray).

राज यांच्या बरोबर शिवसेनेतून बाहेर पडलेल्या मोजक्या साथीदारांमध्ये प्रवीण दरेकर सुद्धा होते. मनसेतून ते आमदार सुद्धा झाले होते. राज ठाकरे यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून दरेकर यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला. सन 2014 नंतर दरेकर यांचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी सूत जुळले, अन् ते भाजपवाशी झाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी