31 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeमुंबईभाजप नेते मोहित कंबोजविरोधात कर्ज बुडवल्याप्रकरणी गुन्हा दाखल

भाजप नेते मोहित कंबोजविरोधात कर्ज बुडवल्याप्रकरणी गुन्हा दाखल

टीम लय भारी

मुंबई: भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) विरोधात आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला. ओव्हरसिज बँकेकडून ५२ कोटी रुपयांचे कर्ज बुडवल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कंबोज यांच्या कंपनीनं 2011 ते 2015 या कालावधीत इंडियन ओव्हरसिज बँकेकडून कर्ज घेतल होतं. मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी ट्विट करत आपली बाजू मांडली आहे तसेच  स्वत:तावरील आरोप फेटाळून लावले आहेत.

त्यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे…

नमस्कार  मुंबई पोलिसांनी माझ्याविरोधात एफआयआर दाखल केली आहे. एक जुनी कंपनी जी 2017 मध्ये बंद झाली आहे. त्याचे बॅंक इश्यू काढून माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. मला असं वाटतं की, महाविकास आघाडी सरकार असं काही करुन माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असेल किंवा मला धमकावण्याचा प्रयत्न करत असेल तर तसं काहीही होणार नाही. हा नवाब मलिकांचा बदला असेल किंवा संजय राऊतांच, मी याविरोधात कोर्टात कायदेशीर लढा देईन. आम्ही याला घाबरणार नाही” असं म्हणत कंबोज यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.

हे सुद्धा वाचा:

प्रदेश काँग्रेसची दोन दिवसीय ‘नवसंकल्प कार्यशाळा’ आजपासून शिर्डीत : बाळासाहेब थोरात

Tejashwi Yadav Is Lalu Yadav’s Political Heir. Party Makes It Official

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी