28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमुंबईमुंबईमध्ये जमावबंदी लागू; कलम १४४ ची घोषणा

मुंबईमध्ये जमावबंदी लागू; कलम १४४ ची घोषणा

राज्यात शांतता आणि सुव्यवस्था नसल्याचं अनेकदा पाहायला मिळत आहे. यामुळे आता राज्यातील मुंबईसारख्या शहरामध्ये जमावबंदीचे आदेश मुंबई पोलिसांनी दिले आहेत. राज्यात बुधवार (२० डिसेंबर) ते (१८ जानेवारी) या कालावधीत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर अनेकदा आणण्यात आल्याने मुंबई पोलिसांनी हे पाऊल उचलल्याचे समजते. यासाठी खबरदारी म्हणून हे पाऊल उचललं आहे. अशातच यासाठी कलम १४४ लागू करण्यात आल्याचं समजतंय.

या काळात ५ हून अधिक लोकं एकत्रित न येण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. जाहीर सभा घेण्यावर बंदी घालण्यात आली. जमावबंदीच्या काळात लाऊड स्पीकर, बँड, फटाके वाजवण्यास मनाई आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगितलं जातंय. असा इशारा आता पोलिसांनी दिला आहे.

हे ही वाचा

‘अजित दादांचा बिनडोकांच्या नादाला लागून कर्जत एमआयडीसीचा (MIDC) निर्णय’

‘रामावर प्रेम असेल तर सितामाईचं संरक्षण करा’

‘दिल्लीतील मंदिराचं स्मशान करून राम तुम्हाला पावणार’?

जमाव बंदीच्या काळात या गोष्टींवर बंदी

५ हून अधिक लोकं एका वेळीस एकत्र येऊ नये आणि कलम १४४ लागू करण्यात आला आहे

२० डिसेंबर ते १८ जानेवारीपर्यंत फटाके, बँड आणि लाऊडस्पीकर लावण्यास बंदी घालण्यात आली आहे.

जमावबंदीच्या काळात आंदोलन मोर्चे काढण्यास बंदी घालण्यात येणार आहे.

न्यायालय, सरकारी कार्यालय, स्थानिक स्वराज्य संस्था येथे अनेक नागरिकांना एकत्र येणार बंदी घालण्यात आली आहे.

सार्वजनिक ठिकाणी घोषणा आणि निदर्शने करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

मोठ्या आवाजात गाणी वाजवण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी