27 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeआरोग्यकोरोना जे एन 1 नव्या व्हेरियंटचा शिरकाव; देशात सावधानता

कोरोना जे एन 1 नव्या व्हेरियंटचा शिरकाव; देशात सावधानता

देशामध्ये केरळ येथे काही दिवसांआधी कोरोना जे एन 1 (J N 1) नव्या व्हेरियंटने शिरकाव केला आहे. यामुळे आता देशात पुन्हा एकदा कोरोनाचे सावट पाहायला मिळणार की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आरोग्य विभागाने काळजी घेण्याचे आश्वासन सांगितले आहे. यामुळे आता देशातील जनता पुन्हा एकदा सावध झाली आहे. याआधी तीन वर्षांआधी कोरोनामुळे देशामध्ये होत्याचं नव्हतं होऊन गेलं होतं मात्र आता पुन्हा एकदा तिच परिस्थिती पाहायला मिळणार का? असा सवाल आ वासून नागरिकांच्या समोर उपस्थित राहिला आहे. अशातच आता भाजपच्या आमदाराला या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची लागण झाली आहे.

आतापर्यंत देशामध्ये जे एन 1 या नव्या व्हेरियंटचे २३ रूग्ण सापडले आहेत. त्याचप्रमाणे एकूण ४० देशामध्ये कोरोनाचे सावट असल्याची माहिती समोर येत आहे. देशाचा विचार केल्यास गोवा येथे सर्वाधिक १९ रूग्ण आहेत. त्याचप्रमाणे राजस्थान येथे २ रूग्ण आहेत. तसेच केरळ आणि महाराष्ट्रामध्ये १-१ रूग्ण असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे आरोग्यविभाग काळजी घेण्यास सांगत आहे.

हे ही वाचा 

मुंबईमध्ये जमावबंदी लागू; कलम १४४ ची घोषणा

‘अजित दादांचा बिनडोकांच्या नादाला लागून कर्जत एमआयडीसीचा (MIDC) निर्णय’

‘रामावर प्रेम असेल तर सितामाईचं संरक्षण करा’

देशामध्ये आज ३५८ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. देशामध्ये एकूण कोरोना रुग्णांची संख्या २ हजार ६६९ एवढी रुग्णसंख्या आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार गेल्या २४ तासांमध्ये ३०० हून अधिक रूग्णांची संख्या वाढली आहे. एवढंच नाही तर आता गाजियाबादचे भाजप आमदार अमित त्यागी यांना जे 1 कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे आता देशभरात या व्हेरियंटपासून सावध होण्याचे अवाहन आरोग्यविभागाने दिले आहे. त्यागी यांना खोकला आणि सर्दी झाली होती. यामुळे त्यांनी तपासणी केली असता, कोरोनाच्या नव्या जे 1 व्हेरियंटची लागण झाल्याची माहिती समोर आली. डॉ. सल्ल्यानुसार अमित त्यागी हे आयसोलेट झाले असल्याची माहिती आता समोर येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी