27 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeराजकीय'अजित दादांचा बिनडोकांच्या नादाला लागून कर्जत एमआयडीसीचा (MIDC) निर्णय'

‘अजित दादांचा बिनडोकांच्या नादाला लागून कर्जत एमआयडीसीचा (MIDC) निर्णय’

राज्यात आता आगामी निवडणुका येत आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कधी काय घडेल आणि बिघडेल हे सांगता येत नाही. अशातच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) या काका-पुतण्यांमध्ये तु तु आणि में में झाल्याचं पाहायला मिळत आहे. काही महिन्यांपासून कर्जत-जामखेड एमआयडीसीचा मुद्दा तसाच राहिला आहे. राम शिंदे कर्जत-जामखेडमधील एसआयडीसी (Karjat-Jamkhed MIDC) रद्द करण्यासाठी आक्रमक आहे. अजित पवार यांनीही राम शिंदे (Ram Shinde) म्हणतील तसंच असा दुजोरा देिला. यावर आता रोहित पवार आक्रमक झाले आहेत. राम शिंदेंचं नाव न घेता, बिनडोकांच्या नादाला लागून दादा निर्णय घेत आहेत, असे रोहित पवार म्हणाले आहेत.

अतिशय अभ्यासपूर्वक एमआयडीसी प्रकल्प मंजूर करण्यासाठी प्रयत्न केला आहे. यासाठी एका बिंडोक व्यक्तीच्या नादाला लागून अजित पवार एमआयडीसी रद्द करण्याचा निर्णय घेत असतील तर तो चुकीची निर्णय आहे. आपण कर्जत-जामखेडचे आमदार आहोत. केवळ राजकीयदृष्टीने हा एमआयडीसीचा निर्णय प्रलंबित करण्याचा विचार होत असेल तर हा केवळ रोहित पवारांचा विषय नाही तर आख्ख्या मतदारसंघाचा विषय आहे. जनतेला दिलेला शब्द पाळता येत नसल्याचं मला दुख आहे. अजित पवार जर एमआयडीसी रद्द करण्याचा निर्णय घेत असतील तर पुतण्या म्हणून मला खूपच वाईट वाटेल असं रोहित पवार म्हणाले आहेत. अजित पवार यांनी कोण खरं आणि कोण खोटं हे पाहावं त्यानुसार त्यांनी निर्णय घ्यायचा आहे.

हे ही वाचा

‘रामावर प्रेम असेल तर सितामाईचं संरक्षण करा’

‘दिल्लीतील मंदिराचं स्मशान करून राम तुम्हाला पावणार’?

मुंबई इंडियन्सकडून फेक फॉलोअर्सचा वापर?

तानाजी सावंत महिन्याला ४ कोटींचं कमिशन खातात 

आरोग्य विभागामध्ये सिएचओंना जो इंन्सेंटीव्ह मिळतो त्यामध्ये आरोग्य मंत्री तानाजी सावंत कमिशन घेतात. एक पत्र आलं असता, त्या पत्रामध्ये तानाजी सावंत यांनी कमिशन देण्याबाबत नमूद केलं होतं. १० हजार रूपये असतील तर त्याला ३ हजार रूपये कमिशन आहे. तसेच यामुळे तानाजी सावंत महिन्याला ४ कोटी खात असल्याचं रोहित पवार म्हणाले आहेत. सरकारला भिकारी करायचं तानाजी सावंत यांनी ठरवलं आहे. मी भाजपसोबत जाण्याबाबत सही केल्या प्रकरणी आरोप करण्यात आले, मात्र अजित पवार यांना विरोधी पक्ष नेते करावे, त्यावर सही केली होती, असे रोहित पवार म्हणाले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी