33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमुंबईमुंबईला आज पुन्हा 'ऑरेंज अलर्ट', विश्रांतीनंतर पाऊस पुन्हा 'इन अॅक्शन' मोडमध्ये

मुंबईला आज पुन्हा ‘ऑरेंज अलर्ट’, विश्रांतीनंतर पाऊस पुन्हा ‘इन अॅक्शन’ मोडमध्ये

टीम लय भारी

मुंबई : अनेक दिवसांपासून शहरात धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने काल काहीशी विश्रांती घेतली होती, चक्क खूप दिवसांनी अनेकांना सुर्यदेवाचे दर्शन झाले, मात्र आज पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ होणार असून मुंबई, मुंबई उपनगराला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा नागरिकांना बाहेर पडताना काळजी घ्यावी लागणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून ‘कोसळधा’र थांबण्याचे नाव घेत नव्हता. प्रचंड पाऊस आणि वारा अशा परिस्थितीत लोक घराबाहेर पडत होते. परंतु काल थोडी विश्रांती घेत पावसाने सगळ्यांनाच दिलासा दिला. दरम्यान आठवड्याभरात कोसळलेल्या दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांची पाण्याची पातळी वाढली असून मुंबईकरांची चिंता काहीशी मिटली आहे.

रविवारी मुंबईत पाऊस पडला नाही, मात्र काहा ठिकाणी रिमझिम सरी बरसल्या दरम्यान आज पुन्हा शहरात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे, त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना योग्य ती काळजी घेण्याबाबतचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा…

विकास कामांची ऐसीतैसी, मुख्यमंत्री शिंदे अजित पवारांचा घेणार बदला?

“माळशेज घाट एक रमणीय सृष्टी सौंदर्याचा खजीना”

पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांचे फोटो फेकले कचऱ्यात

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी