33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमुंबईमुरबाडमधील प्रसिद्ध पिरबाबाच्या मंदिराला तीर्थस्थळाचा दर्जा देण्याची मागणी जोर धरतेय!

मुरबाडमधील प्रसिद्ध पिरबाबाच्या मंदिराला तीर्थस्थळाचा दर्जा देण्याची मागणी जोर धरतेय!

ठाणे जिल्हा हा वनसंपदांनी नटलेला आहे. एकीकडे  सह्याद्रीच्या पर्वत रांगा तर दुसरीकडे निसर्गाची मुक्त उधळण. अशा या ठाणे जिल्ह्यात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. तिथे भाविक भक्तिभावाने दर्शनाला जातात. असेच एक मंदिर ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात आहे, जे सर्वधर्मीय मंडळींचे श्रद्धास्थान आहे. मुरबाड तालुक्यात बळेगाव येथे पिराची उमरोली या गावात गेली शेकडो वर्षाहून अधिककाळ पिरबाबाचे प्रसिद्ध मंदिर आहे.

ठाणे जिल्ह्यात या मंदिरात एकमेव हिंदू मुस्लिम ऐक्य असलेल्या प्रसिद्ध पिरबाबाच्या मंदिरात १ लाखाहून अधिक भाविक  पिरबाबाचे दर्शन घेण्यासाठी येतात. या मंदिराला तीर्थ स्थळाचा दर्जा देऊन या क्षेत्राचा विकास करण्याची मागणी भारतीय पदवीधर प्रतिष्ठान आणि मुरबाड बचाव जनआंदोलन संघटनेचे अध्यक्ष अमोल अनंत पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ठाणे जिल्हाधिकारी आणि केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडे केली आहे.

ठाणे जिल्ह्यात कल्याणपासून दीड तास, मुरबाडपासून जास्तीत जास्त अर्धातास अंतरावर तर टोकवड्यावरून २० मिनिटात उमरोली पिरबाबाचे मंदिर आहे.साधारण शेकडो वर्षांपूर्वी उमरोली या गावात एका भाविकाने पिरबाबाची स्थापना केली. पूर्वी अनेकांना पिरबाबाचा पांढरा शुभ्र घोडाही रात्री दिसायचा असा पूर्वजांचा अनुभव आहे.

पिरबाबाची यात्रा मार्गशीर्ष महिन्यात डिसेंबर महिन्यात भरते. या यात्रेत हिंदू आणि मुस्लिम बांधव एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने आणि मनोभावे पिरबाबाची यात्रा साजरी करतात. या पिरबाबाला भाविक शेती, घरातील सुख समाधानासाठी, आरोग्यासाठी, विविध मागण्यासाठी नवस करू लागले आणि पिरबाबाकडे मागितलेला नवस पूर्ण झाल्यावर गावातील भाविक बाबाच्या यात्रेला वजन काट्यात पेढे, मिठाई, गुळ यामध्ये स्वतःला अथवा परिवारातील मुलाला जोखतात अशी ख्याती पूर्वीपासून परंपरेने सुरु आहे. पिरबाबा चरणी नारळांची तळी फोडली जाते.
हे सुद्धा वाचा
माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा दट्ट्या; ठाणे झेडपी बेरोजगारांचे २२ लाख २८ हजार परीक्षा शुल्काची रक्कम परत करणार!
गणेशोत्सवात मुंबई पोलिसांकडून गणसेवकांची फौज
‘तो’ व्हिडीओ चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियावर फिरवणे खोडसाळपणाचे : एकनाथ शिंदे

या मंदिरात उमरोली गावातील ही नवसाची प्रथा  सुरवातीला मुरबाड तालुक्यात त्यानंतर ठाणे जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील भाविकांना अनुभव आल्याने ठाणे जिल्ह्यासह राज्यातून विविध भागातून  भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पिरबाबा हिंदू-मुस्लिम बांधवांचे श्रद्धास्थान असले तरीही या यात्रेत मराठी हिंदू मुस्लिम बांधवांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पिरबाबाच्या मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन या स्थळाचा विकास करण्यात यावा अशी विनंती  अमोल पवार यांनी  केली आहे. राज्य सरकारने मध्यंतरी राज्यातील विविध दारमिक स्थळांना पर्यटन आणि तीर्थस्थळांचा दर्जा दिला आहे. त्याच धर्तीवर या मंदिराला तीर्थस्थळाचा दर्जा द्या अशी मागणी आता जोर धरत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी