31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्र३१ डिसेंबरला हॅंग ओवर होणाऱ्यांचं ओझं हॉटेल मालक आणि ड्रायव्हरच्या खांद्यांवर

३१ डिसेंबरला हॅंग ओवर होणाऱ्यांचं ओझं हॉटेल मालक आणि ड्रायव्हरच्या खांद्यांवर

३१ डिसेंबर दिवशी नवीन वर्षाचं स्वागत करून जुन्या वर्षाच्या आठवणी ताज्या ठेवल्या जातात. जुन्या वर्षाने अनेक सुखदुखाच्या गोष्टी, अनेक किस्से दिले आहेत. त्या सदैव आठवणी ठेवत नवीन वर्षांचं स्वागत तरूण मंडळी मोठ्या दिमाखात करतात. आपलं दुख, निराशा आयुष्यातील थकवा घालवण्यासाठी अनेक मंडळी वाईन, मद्यप्राशन करतात. मात्र मद्यप्राशन करत असताना सरकारने महत्त्वाची काळजी घेण्यासाठी सांगितलं आहे. मद्यधुंद परिस्थितीमध्ये वाहन चालवू नये याकरता आता ठाणे वाहतूक नियंत्रण पोलिस प्रशासनाने आदेश दिला आहे. अनेकदा मद्यप्राशन करताना अपघात होण्याची शक्यता आहे. यासाठी त्यावेळी काळजी घेणं आवश्यक आहे.

ठाणे वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी दिला आहे. ठाण्यातील हॉटेल चालकांनी पोलिसांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचं डॉ राठोड म्हणाले आहेत. यासाठी मद्दधुंद अवस्थेत वाहन चालणाऱ्यांवर वाहतूक पोलिस नियंत्रण कारवाई करणार आहेत. अपघात टाळावा हा यामगील मुख्य उद्देश आहे. अति मद्यधुंद झाल्यास वाहन चालवण्यावर अटकाव करा असं सतत पोलिस प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे पाच ते सहा वाहनचालक उपलब्ध ठेवा. गरज पडल्यास खसगी कारचालकांचा मोबाईल क्रमांक ठेवा.

हे ही वाचा

श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरेंनाही निमंत्रण, विहिंपचे मोठे मन

‘पक्ष फुटला की नाही ते कॉंग्रेसने ठरवू नये’

चंद्रकांत पाटीलांचं सोलापूरवरील प्रेम, विकासकामांसाठी आणणार मोठा निधी

एखाद्याने मद्यप्राशन केल्यास ते स्वत:हून ती अधिक इतरांसाठी गंभीर बाब आहे. रस्त्यावर चालत असलेल्या नागरिकांना यामुळे धोका होऊ शकतो. या ३१ डिसेंबर दिवशी अनेक लोकं उशिरापर्यंत जागणार असल्याचं अनेकदा पाहायला मिळतं. यासाठी ग्राहकांच्या सुरक्षितेसाठी हॉटेल चालकांनी उपाययोजना कराव्यात.

हॉटेल चालकांना आपल्या ग्राहकांना घरापर्यंत सोडवण्याची जबाबदीरी

या दिवशी अनेक लोकं मद्यधुंद असल्याने यांची जबाबदारी कोणी घ्यायची असा एक प्रश्न उपस्थित राहिला आहे. मद्यधुंद परिस्थितीमध्ये जर वाहन चालवल्यास एक तर ते चुक असून इतरांच्या जीवनासाठीही धोकादायक असल्याचं पोलिस प्रशासनाने माहिती दिली आहे. काही दिवसांआधी कार्यालयामध्ये एक बैठक झाली होती. या बैठकीमध्ये सर्व बाबी हॉटेल चालकांना पटवून दिल्या आहेत. यावेळी ठाणे शहरातील ३५ हॉटेल चालक, सहायक पोलिस आयुक्त कवयित्री गावित तसेच वाहतूक शाखेचे अधिकारी उपस्थित होते.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी