33 C
Mumbai
Wednesday, February 14, 2024
Homeमुंबईवर्षाच्या अखेरीस सिमकार्ड वापराचे नवीन नियम जारी

वर्षाच्या अखेरीस सिमकार्ड वापराचे नवीन नियम जारी

मोबाईलशिवाय माणूस जगू शकत नाही ही माहिती मिळवण्यासाठी कोणतेही संशोधन करायची गरज नाही. आपल्या आजूबाजूच्या निरीक्षणावरून हे कळते. केवळ मोबाईल असून चालत नाही तर त्यासाठी त्यात सिमकार्डही (simcard) असणे गरजेचं असतं. सिमकार्डशिवाय मोबाईल आणि माणूस अपूरा आहे. एका ठिकाणाहून दुसरीकडे संदेशाची देवाण घेवाण करण्यासाठी मोबाईलमध्ये सिमकार्ड असणे गरजेचं असतं. मात्र कधीकधी काही सिमकार्डचे वापरकर्ते सिमकार्डचा अयोग्य वापर करतात. यामुळे वर्षाच्या अखेरीस म्हणजेच १ डिसेंबर पासून सिमकार्ड वापरकर्त्यांसाठी आणि विक्रेत्यांसाठी काही नियमांमध्ये बदल करण्याबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. हे नियम १ ऑक्टोंबरपासून लागू करण्यात आले होते, मात्र सरकारने हे नियम हे १ डिसेंबरपासून लागू होणार असल्याची माहिती दिली आहे. (New rules Simcard)

जर तुम्ही सिमकार्ड विक्रेते असाल तसेच जर तुम्हाला सिमकार्ड विकत घ्यायचे असेल तर तुम्हाला नवीन नियमाबाबत माहिती असणे गरजेचे आहे. जर तुम्हाला याबाबत कोणतीही माहिती ठाऊक नसेल तर तुम्ही गोत्यात येऊ शकता. यंदाच्या वर्षात ऑगस्ट महिन्यात सरकारने सिमकार्डविषयी एक नवी गाईडलाईन जारी केली आहे. ही गाईडलाईन फार महत्वाची असून १ डिसेंबरपासून देशात लागू होणार आहे. देशातील ६७ हजार सिमडिलर्सना ब्लॅक लिस्टमध्ये टाकले असून ५२ लाख मोबाईल बंद करण्यात आले आहेत. बनावट सिमकार्डचे ६६ हजार वॉट्सअॅप खाते बंद करण्यात आली आहेत.

सिमकार्ड विक्रेत्याला तुरूंगवास

सिमकार्ड विक्रेत्यांना आता पोलिसांकडून पडताळणी करण्यात येणार असल्याचा नियम लागू करण्यात आला आहे. सिमकार्ड विक्रेत्यांनी जर पोलिसांकडून पडताळणी न करता सिमकार्ड विक्री केल्यास १० लाख रूपयांचा दंड आकारण्यात येऊ शकतो. त्या व्यक्तीला तुरूंगवासाची शिक्षा देखील होऊ शकते. यामुळे सिमकार्ड विक्रेत्याला रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे.

हे ही वाचा

दत्ता दळवींच्या अटकेनंतर गाडीची तोडफोड

दत्ता दळवी, नाम तो सुना होगा !

विराट कोहली टी २० खेळणार का?

सिम विक्रेत्यांप्रमाणे सिम वापकर्त्यांसाठी नियम

अनेकदा सिम विक्रेत्यांप्रमाणे सिम वापरर्त्यांसाठी हा नियम फारच महत्वाचा आहे. अनेकदा मोबाईल फोनवरून खोटं सिम वापरून फसवणूक झाल्याच्या तक्रारी आता पुढं आल्या आहेत. यामुळे आता विक्रेत्यांप्रमाणे वापरकर्त्यांना नवीन सिमकार्ड खरेदी करायचे असल्यास त्याला आधारकार्ड आणि घरचा कायमस्वरूपी असलेला पत्ता जोडायचा आहे. यासाठी एकाच वेळी अनेक सिम घेणाऱ्या व्यक्तींवर बंदी घालण्यात आली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी