29 C
Mumbai
Tuesday, February 27, 2024
Homeमहाराष्ट्रट्रिपल महाराष्ट्र केसरी पटकावरणारा पैलवान लोकसभा निवडणूक लढणार?

ट्रिपल महाराष्ट्र केसरी पटकावरणारा पैलवान लोकसभा निवडणूक लढणार?

महाराष्ट्र राज्याचे नाव अनेक खेळाडूंनी शिखरावर नेऊन ठेवले आहे. त्यांनी आपल्या कर्तृत्वावर स्पोर्ट्स कोट्यातून शासकीय नोकरी मिळवत आपले वर्चस्व अबाधित ठेवले आहे. अशातच आता ट्रिपल महाराष्ट्र केसरीवर आपले नाव कोरणारा जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील तरूण २०१७ मध्ये उपअधिक्षक पदी निवड झाल्याने पोलिस अधिकारी म्हणून कार्यरत आहे. मात्र आता पोलिस आधिकारी पैलवान विजय चौधरीली कुस्तीच्या आखाड्यानंतर लोकसभा निवडणूक लढवायची असल्याची इच्छा माध्यमांशी बोलत असताना व्यक्त केली आहे. ही माहिती विजयने टीव्ही ९ मराठीशी बोलताना दिली आहे.

विजय चौधरी हा मुळचा जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील आहे. २०१७ या वर्षात विजयची अपअधिक्षक पदासाठी निवड झाली होती. ते सध्या पुण्यात कार्यरत आहेत. विजयची खास ओळख म्हणजे विजय एक नाही, दोन नाही तर तीन वेळा महाराष्ट्र केसरीचा दावेदार आहे. पैलवानकी त्यानंतर पोलिस आणि आता मात्र विजय चौधरीला राजकारणात एंट्री करायची फार इच्छा आहे. निवडणुकीच्या आखाड्यात विजयला कोणत्या पक्षाचे तिकिट मिळणार यावर अजूनही कोणतीही माहिती समोर आली नाही. कोणत्या राजकीय पक्षाकडून ऑफर आली आहे का? असे विचारले असता त्याने माध्यामांशी संवाद साधत खुलासा केला आहे.

हे ही वाचा

वर्षाच्या अखेरीस सिमकार्ड वापराचे नवीन नियम जारी

दत्ता दळवींच्या अटकेनंतर गाडीची तोडफोड

दत्ता दळवी, नाम तो सुना होगा !

कोणत्या पक्षाकडून ऑफर

माध्यमांनी विजयला कोणत्या पक्षाकडून ऑफर आली आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर विजयने खुलासा केला आहे. अजून तरी कोणत्याच पक्षाने ऑफर केली नाही. मात्र भाजप आपला आवडता पक्ष आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपमधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावर ते कोणता मतदारसंघ निवडणार याबाबत उत्सुकता आहे.

कोणता मतदारसंघ निवडणार?

विजय हे मुळचे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील सायगावचे आहेत. या ठिकाणी गेली काही वर्षे भाजपचे खासदार उन्मेश पाटील आहेत या मतदारसंघात उन्मेश पाटील आपल्या पर्यायी उमदा युवा नेता शोधत आहे, यामुळे आता पैलवान गडी राजकीय क्षेत्रात निवडणुकांच्या आखाड्यात विरोधकांना चितपट करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी