28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeराजकीयदत्ता दळवींच्या अटकेनंतर गाडीची तोडफोड

दत्ता दळवींच्या अटकेनंतर गाडीची तोडफोड

शिवसेना संस्थापक दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरेंनी अनेक शिवसैनिक घडवले होते. त्यापैकी दत्ता दळवी हे एक कट्टर शिवसैनिक आहेत. वेळ प्रसंगी ईडीला घाबरत अनेक आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून भाजपशी हातमिळवणी केली. मात्र पडत्या शिवसेनेच्या काळात उबाठा नेते संजय राऊत, दत्ता दळवींसारखी मंडळी आजही शिवसेनेसोबत आहेत. दत्ता दळवी हे मुंबईचे माजी महापौर होते. एकनाथ शिंदेंविरोधात खालच्या भाषेत वक्तव्य केल्याने दळवींना पोलिसांनी ताब्यात घेतले. आणि तीन ते चार तरूणांनी दळवींच्या गाडीची तोडफोड केली.

काय आहे नेमकं प्रकरण

(२६ नोव्हेंबर) दिवशी (उबाठा) गटाचा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा होता. या मेळाव्यात दत्ता दळवींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर खालच्या भाषेत टीका केली. यामुळे (२९ नोव्हेंबर) दिवशी सकाळी ८ वाजता भूषण पलांडे या व्यक्तीने एकनाथ शिंदेंविरोधात दळवींनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने दत्ता दळवींची भांडुप पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यांना अटक देखील करण्यात आली आहे. मात्र आता हा वाद शमणार असे वाटत होते. मात्र तसं झालं नसून दत्ता दळवींच्या गाडीवर काही तरुणांनी दगड, लाकडांनी तोडफोड केली.

हे ही वाचा

दत्ता दळवी, नाम तो सुना होगा !

विराट कोहली टी २० खेळणार का?

‘नालायक’ शब्दावरून नेत्यांमध्ये कलगीतुरा

दत्ता दळवींचा मेळाव्यात एकनाथ शिंदेंवर हल्ला

(२६ नोव्हेंबर) दिवशी दत्ता दळवी यांनी एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर टीका केली आहे. ते म्हणाले की, आता मिंधे आहे हे सर्वांना माहीत आहे. गद्दारीची कुऱ्हाड घेऊन मिंधे गट आरुढ झाले आहे. आज जर दिघे साहेब असते ना तर या एकनाथला चाबकाने फोडून काढले असते. एकनाथ शिंदे काय करत होता? काय होता? हे सर्व आम्ही बघितलेलं होतं. बाळासाहेबांच्या जवळ आला बाळासाहेबांनी आशीर्वाद दिला. उद्धव साहेबांच्या जवळ आला उद्धव साहेबांनी जवळ केलं. मात्र त्याने एवढी गद्दारी केली. असे बोलत असताना दळवींनी एकनाथ शिंदेंवर शिवीगाळ केली.

एकनाथ शिंदेंवर शिवीगाळ

नाव बाळासाहेबांचं वापरायचे. आता ते हिंदुहृदयसम्राट वापरत आहेत. अरे ###डीच्या तुला हिंदुहृदयसम्राटाचा अर्थ तरी कळतो का?, अशी टीका दत्ता दळवींनी एकनाथ शिंदेंवर केली, दळवींची भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. (A) 153 (B) 153 (A) (1) कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. यावरून वाद शांत होईल असे वाटत होते मात्र काही तरुणांनी दत्ता दळवींच्या गाडीवर हल्ला केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी