राखी सावंत दुसऱ्यांदा बोहल्यावर चढली आहे. त्यासाठी तिने धर्म बदलला आहे. (Rakhi Sawant Changed Religion For Marriage) राखी सावंत धर्म बदलून फातिमा म्हणून दुसऱ्यांदा बोहल्यावर चढली. त्यानंतर, इस्लाम बदलणार की नाही? असा संतप्त सवाल तस्लीमा नसरीन यांनी केला आहे. (Taslima Nasreen Attacks Islam) त्यांचे ट्वीट सध्या व्हायरल झाले आहे. इतर धर्मांप्रमाणे इस्लामचाही आता विकास व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
राखी सावंत हिने तिचा मुस्लीम बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानी याच्याशी धर्म बदलून लग्न केले आहे. प्रियकर आदिलशी विवाह करण्यासाठी राखीने इस्लाम धर्म स्वीकारला. तिने आपले नावही आता बदलून फातिमा केले आहे. राखी सोशल मीडियावर तिच्या लग्नाचे भरभरून पुरावे देत आहे. मात्र, आदिल यावर काहीही बोलायला तयार नाही. राखी जवळपास वर्षभरापासून आदिलशी डेट करत आहे. आता दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, ज्यात राखी आणि आदिल लग्न करताना दिसत आहेत. राखीने तिचे नाव बदलून फातिमा ठेवल्याच्याही बातम्या येत आहेत. खुद्द आदिलने त्याच्या इंस्टाग्रामवर अशी बातमी शेअर केली आहे. मात्र, आता आदिलने याबाबत मौन बाळगले आहे. आपण यावर नंतर उत्तर देऊ, असे त्याने म्हटले आहे.
गेल्याच वर्षी राखीने मुंबईतील ओशिवारा पोलिस ठाण्यात आदिलविरुद्ध एफआयआर दाखल केल्याची बातमी व्हायरल झाली होती. त्यानंतर दोन महिन्यातच अचानक राखी आपल्या लग्नाचे पुरावे सार्वजनिक करू लागल्याने सर्वांना धक्का बसला आहे. अर्थात राखी प्रसिद्धीसाठी नेहमीच स्टंट करीत असते. त्यावेळीही तिने पोलिस स्टेशनबाहेर मीडियावाल्यांना धमकी दिली होती. ती म्हणाली होती, “मै सबको वॉर्निंग देना चाहती हू, मेरे और आदिल के बीच कोई आयेगा तो मै छोडूगी नही. लोग मेरे और आदिल के खिलाफ झूठी खबरे छाप रहे है, की मैने आदिल के खिलाफ कोई केस किया है, ये सरकार झूठा है. मैने एफआयआर किया है, लेकीन शर्लिन चोप्रा, के खिलाफ, मेरे आदिल के खिलाफ़ नहीं. आदिल और मेरा हंसो का जोडा है. कोई भी अगर मेरे जोडे को तोडेगा, तो मै उसको नही छोडूगी.”
View this post on Instagram
“इतर धर्मांप्रमाणे इस्लामचाही विकास झाला पाहिजे. इतर धर्मांप्रमाणेच, इस्लामने देखील मुस्लीम आणि गैर-मुस्लीम यांच्यातील विवाह आता मान्य करायला हवेत, ते स्वीकारायला पाहिजे. ”
– तस्लीमा नसरीन
इस्लामला बदलायला हवे
राखीच्या लग्नानिमित्ताने तस्लीमा नसरीनचे ट्वीट सध्या सध्या चर्चेत आहे. राखीच्या निमित्ताने तस्लीमा यांनी इस्लाम धर्माविरोधात संताप व्यक्त केला आहे. इतर धर्मांप्रमाणे इस्लामचाही विकास झाला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. मुस्लीमाशी लग्न करण्यासाठी राखीप्रमाणे मलाही धर्मांतर करावे लागले होते. राखी सावंतला इस्लाम स्वीकारावा लागला, कारण तिने एका मुस्लीम मुलाशी लग्न केले. इतर धर्मांप्रमाणेच, इस्लामने देखील मुस्लीम आणि गैर-मुस्लीम यांच्यातील विवाह आता मान्य करायला हवेत, ते स्वीकारायला पाहिजे, असे तस्लीमा यांनी म्हटले आहे.

पैगंबरांनी केले होते लहानग्या मुलीशी लग्न!
तस्लीमा यांच्या ट्वीटवर प्रतिक्रिया देताना एका युझरने म्हटले, की आम्ही नाही बदलणार. आम्ही पैगंबर मोहम्मद यांनी दिलेल्या तत्त्वांशी कधीही तडजोड करणार नाही. यावर नसरीन यांनी उत्तर दिले की, त्यांना 13 बायका होत्या. त्यात 6 वर्षांची मुलगी आणि सून यांचाही समावेश होता. तुम्हाला त्यांच्या या तत्त्वांचे पालन करायचे आहे का? असा सवाल तस्लीमा यांनी केला.
तस्लीमा नसरीन यांनी आज जी टीका केली, त्याच आशयाच्या टीकेवरून काही दिवसांपूर्वी जोरदार वाद उफाळला होता. भाजप प्रवक्ता नुपूर शर्मा यांनीही पैगंबर मोहम्मद यांनी लहानग्या मुलीशी लग्न केल्याचे म्हटले होते. त्यावरून देशभर मुस्लीम संघटनांनी मोर्चे काढून निदर्शने केली होती. नुपूर शर्मा यांच्यावर माफी मागण्यासाठी प्रचंड दबाव आणला गेला होता.
हे सुद्धा वाचा
पैगंबरांचा अवमान करणाऱ्या नुपूर शर्माच्या अटकेसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक
नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात सोलापूरमध्ये निदर्शने
‘लज्जा’ कादंबरीमुळे बांगला देशातून तस्लिमा नसरीन यांना का केले हद्दपार, जाणून घ्या