31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमुंबईमुंबई पोलिसांवर आरोप करणाऱ्या राणा दाम्पत्याची संजय पांडे यांनी केली पोलखोल

मुंबई पोलिसांवर आरोप करणाऱ्या राणा दाम्पत्याची संजय पांडे यांनी केली पोलखोल

टीम लय भारी

मुंबई : राणा दाम्पत्याला शनिवारी खार पोलिसांकडून अटक (Sanjay Pandey) करण्यात आले. त्यानंतर राणा दाम्पत्या व त्यांच्या समर्थाकांनी खार पोलिसांनावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. नवनीत राणा यांना तंरुगात पाणी दिले जात नव्हते, त्यांना प्रसाधानगृहात जाण्यापासून रोखले होते. त्याबरोबर नवनीत राणाया मागासवर्गीय असल्याची त्यांना आठवण करू दिली जात आहे. अशा प्रकारचे आरोप राणा दाम्पत्यांनी खार पोलिसांवर केले आहेत. (Sanjay Pandey the Rana couple who made allegations against the Mumbai police)

या संपुर्ण प्रकरणा बाबत नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिले होते. (Sanjay Pandey) त्यानंतर लोकसभा सचिवालयाने याची गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांना याचा अहवाल मागीतला होता. राणा दाम्पत्याच्या या गंभीर आरोपानंरत मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी एक ट्वीट करुन सत्यता मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

त्यामुळे आता राणा दाम्पत्याने केलेल्या आरोपामध्ये किती तथ्य आहे, हे या ट्वीटच्या माध्यमातून समोर आलेल्या व्हिडिओमधून तपासले जाईल. संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी आमदार रवी राणा आणि खासदरा नवनीत राणा यांचा चहा पितानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. राणा दाम्पत्याला पोलीस स्टेशनमध्ये चांगली वागणूक देण्यात येत असल्याचे यातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

हे सुध्दा वाचा :- 

‘Do not treat patients like a commodity’: Mumbai CP Sanjay Pandey issues stern warning to doctors

नवनीत राणांचा कोठडीत छळ झालेला नाही : दिलीप वळसे पाटील

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी