26 C
Mumbai
Monday, March 20, 2023
घरराजकीयसत्यजित तांबे यांच्या बंडानंतर अहमदनगर काँग्रेसमध्ये मोठ्या उलथापालथी

सत्यजित तांबे यांच्या बंडानंतर अहमदनगर काँग्रेसमध्ये मोठ्या उलथापालथी

नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर काँग्रेसमधून सत्यजित तांबे यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना पाठींबा जाहीर केला होता. मात्र अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी मात्र सत्यजित तांबे यांना पाठिंबा देत जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मात्र आक्रमक भूमिका घेत जिल्हा काँग्रेस कार्यकारणी (Ahmednagar Congress) बर्खास्त केली आहे. सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांच्या बंडानंतर त्यांचे मामा आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांची अद्याप याबाबत कोणतीही प्रतिक्रीया समोर आलेली नाही. दरम्यान नाना पटोले यांनी जिल्हा काँग्रेस कार्यकारणी बर्खास्त केल्यामुळे थोरात यांच्यासाठी हा धक्का असल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात रंगली आहे.  (Ahmednagar Congress in Major upheaval after Satyajit Tambe’s revolt)

सत्यजित तांबे यांनी नाशिक पदवीधरच्या निवडणूकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले. त्यानंतर तांबे यांच्या समर्थनार्थ अनेक पदाधिकाऱ्यांनी बाजू घेतली. अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी देखील तांबे यांना पाठींबा दिला. त्यामुळे पक्षाने साळुंके यांना नोटीस पाठविली होती. त्यानंतर साळुंके यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. जिल्हा काँग्रेसमधील गटबाजीमुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले चांगलेच आक्रमक झाले. पटोले यांनी कारवाईचा बडगा उगारत थेट जिल्हा कार्यकारणीच बर्खास्त करुन टाकली.

हे सुद्धा वाचा

सत्यजित तांबे यांची चुप्पी; तर भाजपची भूमिका देखील अस्पष्ट

नाशिक पदवीधरमधून सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात थेट लढत!

सत्यजित तांबे यांच्याबाबत काँग्रेसचा अखेर मोठा निर्णय; मविआचा पाठिंबा कुणाला?

पटोले यांची ही कृती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासाठी धक्कादायक असल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात रंगली आहे. कारण जिल्हा कार्यकारणीत थोरात यांचे समर्थकांची संख्या अधिक होती. तर जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते आणि पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख हे पटोले यांच्या जवळचे मानले जातात त्यांच्याच सांगण्यावरुन जिल्ह्यातील निर्णय घेतले जात असल्याची जेरदार चर्चा सध्या जिल्ह्याच्या राजकारणात रंगली आहे. बाळासाहेब थोरात यांना दुखापत झाल्याने ते सध्या विश्रांती घेत आहेत. मात्र जिल्हा कार्यकारणी बर्खास्त केल्याने थोरात यांच्यासाठी हा धक्का असल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी