27 C
Mumbai
Wednesday, August 3, 2022
घरमुंबईबाळासाहेबांच्या स्नुषा स्मिता ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला

बाळासाहेबांच्या स्नुषा स्मिता ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला

टीम लय भारी

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात नेहमीच कोणी ना कोणी सहभागी होताना दिसत आहेत. जे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आधी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला होता. त्यांनी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. पण आता थेट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्नुषा स्मिता ठाकरे (Smita Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट (Balasaheb Thackeray daughter-in-law Smita Thackeray meets CM Eknath Shinde) घेतल्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत खळबळ माजली आहे.

बाळासाहेब ठाकरे यांचे ज्येष्ठ पुत्र जयदेव ठाकरे यांच्या स्मिता ठाकरे या पत्नी आहेत. त्यांनी बॉलिवूड मध्ये चित्रपटांची निर्मिती सुद्धा केली आहे. पण काही वर्ष त्या राजकरणात देखील सक्रिय होत्या. त्यामुळे त्यांच्याकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या उत्तराधिकारी म्हणून सुद्धा पाहीले गेले आहे. बाळासाहेब ठाकरे हयात असताना स्मिता ठाकरे या कायमच त्यांच्यासोबत दिसून यायच्या.

बाळासाहेब ठाकरे हयात असताना स्मिता ठाकरे यांचा राजकारणातील वावर वाढल्याने पुढे जाऊन स्मिता ठाकरे याचं शिवसेना पक्षाच्या प्रमुख होतील, असे चित्र निर्माण झाले होते. पण त्याचवेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे असे दोन गट शिवसेनेत निर्माण झाल्याने स्मिता ठाकरे या राजकारणात मागे पडल्या. आणि त्यानंतर स्मिता ठाकरे या राजकरणातून बाहेर पडून समाजकार्य करू लागल्या.

दरम्यान, स्मिता ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने त्या पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होणार असल्याचे बोलले जात आहे. पण एकनाथ शिंदे आणि स्मिता ठाकरे यांच्या या भेटीमुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. ‘मी समाजसेवा करते, राजकारणात नाही.’ असे स्वतः स्मिता ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. स्मिता ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे एकनाथ शिंदे यांची सोमवारी (दि. २७ जुलै २०२२) भेट घेत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिला.

हे सुद्धा वाचा :

शिवसेनेच्या काही बंडखोरांसाठी उद्धव ठाकरेच पक्षप्रमुख

मुख्यमंत्री शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा, संदेशात ‘पक्षप्रमुख’ म्हणणे टाळले

‘उद्या हे महाशय स्वत:ला नरेंद्रभाई मोदी समजतील’, ठाकरेंची शिंदेंच्या महत्त्वकांक्षी लालसेवर टीका

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!