27 C
Mumbai
Saturday, March 18, 2023
घरमुंबईपंतप्रधानांची सभा झाली की पुन्हा भिंत बांधू, एवढा गदारोळ कशासाठी?

पंतप्रधानांची सभा झाली की पुन्हा भिंत बांधू, एवढा गदारोळ कशासाठी?

वांद्रे-कुर्ला संकुल येथील गुरुवारच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सभेसाठी कालिना विद्यापीठाची (Mumbai University) संरक्षक भिंत तोडण्यात आली. मागील वर्षीदेखील एकनाथ शिंदे गटाने दसऱ्यानिमित्त ‘एमएमआरडीए’ मैदानावर आयोजित केलेल्या रॅलीसाठी गाड्या पार्किंगसाठी कालिना विद्यापीठातील आवाराचा वापर केला होता. याबाबत विद्यार्थ्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना प्रत्र लिहून विरोध दर्शविला होता. मात्र, याला विरोध करणाऱ्या विद्यार्थी संघटनेविरोधातच बीकेसी पोलिसांनी भा.द.वि. कलम १४९ अंतर्गत नोटीस बजावली होती. या राजकीय प्रथेविरोधात आता विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. (Students aggressive against decision of the university administration) राजकीय कार्यक्रमांसाठी शैक्षणिक वास्तूंचा वापर करणे योग्य आहे का? सततच्या या कार्यपद्धतीमुळे भविष्यात हा पायंडा राजकीय पक्षांना पाडायचा आहे का? असा सवाल विद्यार्थीवर्गातून उपस्थित होत आहे.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रातील तरुणांच्या तोंडचा घास पळवला हाच मुंबईचा भाग्योदय का ?

महाराष्ट्रातील तरुणांच्या तोंडचा घास पळवला हाच मुंबईचा भाग्योदय का ?

पंतप्रधान मोदींचा उद्या मुंबई दौरा; वाहतुक व्यवस्थेत असतील ‘हे’ बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे गुरुवारी वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानात आयोजन करण्यात आले. मुंबईतील विकासकामांच्या उद्घटनासाठी पंतप्रधानांचा हा दौरा आयोजित करण्यात आला. या सभेसाठी येणाऱ्या लोकांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी कालिना येथील मुंबई विद्यापीठाची संरक्षक भिंत मनमानीपणे तोडण्यात आली. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात विद्यार्थीवर्गात प्रचंड रोष उत्पन्न झाला आहे. ही भिंत तोडून प्रशासनाने विद्यार्थ्यांची विशेषत: मुलींची सुरक्षा धोक्यात आणली आहे, असा आरोप विद्यार्थी संघटनेने केला आहे. राजकीय कार्यक्रमांसाठी विद्यापीठ परिसराचा वापर करणे कितपीत योग्य आहे? असा संतप्त सवालही विद्यार्थ्यांनी केला आहे.

 

कलिना कॅम्पसची भिंत पाडून मुंबई महापालिका आणि विद्यापाठ प्रशासनाने विद्यार्थ्यांची विशेषत: मुलींची सुरक्षा धोक्यात आणली आहे. तसेच राजकीय कार्यक्रमांसाठी विद्यापीठाचा कॅम्पस वापरणे कितपीत योग्य आहे?” असा सवाल राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे नेते अमोल माटेले यांनी केला आहे. या विरोधात युवा सेनेनेदेखील आवाज उठविला आहे. विद्यापीठ आवारात प्रवेश करण्यासाठी तीन प्रवेशद्वार असतानासुद्धा विद्यापीठाची भिंत पडून हा रस्ता तयार करण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होणार असल्याची प्रतिक्रिया युवासेनेचे नेते प्रदीप सावंत यांनी दिली आहे.

विद्यापीठाची नेमस्त भूमिका

विद्यापीठ प्रशासनाच्या या निर्णयाला विद्यार्थी संघटनानांनी जरी आक्षेप घेतला असला तरी प्रशासनाने याबाबत नेमस्त भूमिका घेतलेली दिसते. विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधांचा विचार करण्याऐवजी विद्यापीठ प्रशासनही राजकीय पक्षांचीच ‘री’ ओढताना दिसत आहे. पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी येणाऱ्यांना जवळच पार्कींग सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी ही भिंत तोडण्यात आली असल्याचे प्रशासनाने म्हंटले आहे. कार्यक्रमानंतर मुंबई महापालिकेकडून ही भिंत पुन्हा बांधण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी