28 C
Mumbai
Monday, July 8, 2024
Homeमुंबईपालघर येथील 46 लसीकरण केंद्र बंद; फक्त 5 केंद्रात होणार लसीकरण

पालघर येथील 46 लसीकरण केंद्र बंद; फक्त 5 केंद्रात होणार लसीकरण

टीम लय भारी

पालघर :- पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात एकूण 51 लसीकरण केंद्रे होती. त्यातील 46 केंद्रे कायमस्वरूपी बंद करून त्यांना खाजगीत लस विक्री करण्याची परवानगी दिलेली आहे. सोमवारपासून वसई विरार येथे एकदाही कोविशिल्डची लस आलेली नाही. फक्त अगरवाल केंद्रावर कोवॅक्सिन लस उपलब्ध होत होती. पालघर जिल्ह्यात आजपर्यंत वसई व विरार भगत सर्वाधिक लसीकरण झालेले आहे (Vasai and Virar Bhagat have been vaccinated the most in Palghar district till date).

प्रत्येकाला आपल्या घराजवळ लस मिळावी म्हणून बरीच केंद्रे सुरू करण्यात आली होती. परंतु लसींच्या तुरळक पुरवठ्यामुळे प्रत्येक केंद्रावर फक्त 34 ते 50 पर्यंत लसी उपलब्ध होत होत्या. याचमुळे वाशिलेबाजी सुद्धा वाढत होती तसेच केंद्र निवडताना गोंधळ होत होता. तसेच स्लॉट्स काही सेकंदातच संपत होते. आता फक्त पाचच केंद्रे असल्याने नागरिकांना पूर्वीपेक्षा कमी समस्यांना सामोरे जावे लागेल.

विमान अपघातात शिक्षकाचा मृत्यू तर विद्यार्थ्यांनीस गंभीर दुखापत

टोकियो ऑलिम्पिकवर कोरोनाचे सावट; व्हिलेजमध्ये एक कोरोना संक्रमित

उर्वरित 46 केंद्रांना राज्य सरकार कडून लसी विकत घेऊन सशुल्क लसीकरणास परवानगी दिलेली आहे. त्यापैकी 3 केंद्रांना थेट कंपनीकडून लसी विकत घेण्यास सुद्धा परवानगी देण्यात आलेली आहे.

Vasai and Virar Bhagat have been vaccinated
लस

चीनच्या मुद्यांवरून राहुल गांधींनी मोदींना लगावला खोचक टोला

Most COVID deaths in England now are in the vaccinated – here’s why that shouldn’t alarm you

तुळींज येथील केंद्र, बोलींज येथील केंद्र, माणिकपूर येथील गुजराती शाळा तसेच डी एम पेटिट सरकारी रुग्णालय व अगरवाल हॉस्पिटल अशा 5 केंद्रांवर निःशुल्क लस नागरिकांना उपलब्ध होईल (The vaccine will be available to the citizens free of cost at 5 centers).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी