34 C
Mumbai
Sunday, June 4, 2023
घरमुंबईमुंबईत आजपासून महिनाभर पाणीकपात! ठाण्यातील 'वागळे इस्टेट बोगदा कांड'चा फटका

मुंबईत आजपासून महिनाभर पाणीकपात! ठाण्यातील ‘वागळे इस्टेट बोगदा कांड’चा फटका

मुंबईतील हजारो लिटर पाणी वाया जात असून नागरिकांना यावेळी मोठ्या पाणीकपातीस सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती नियंत्रणाने सर्व लोकांना पुढील काही दिवस किमान पाणी वापरण्याचे आवाहन नागरी अधिकाऱ्यांनी केले आहे. वागळे इस्टेट परिसरात रोज दहा दशलक्ष म्हणजे एक कोटी लिटर पाणी वाया जात आहे. नोव्हेंबर 2022 पासून ही गळती सुरू आहे. दुसरीकडे मुंबईला मात्र रोज पाणी कपातीचा सामना करावा लागत आहे, याबाबत राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी माहिती देत वृत्ताला दुजोरा दिला. त्यामुळे मुंबईकरांना महिनाभर पाणी कपतीच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.

 

ठाण्यातील जलबोगद्याला गळती लागल्याने सुमारे पाच महिन्यांपासून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात होते. अखेर बीएमसीने ही बाब लक्षात येताच ही गळती दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून 30 एप्रिलपर्यंत मुंबईत 15 टक्के पाणीकपात होणार आहे. बीएमसीच्या हायड्रोलिक विभागाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या बोगद्याला ठाण्यात बोअरवेल खोदताना गळती लागली आहे. या लिकेजच्या दुरुस्तीचे काम आजपासून सुरू होणार असून, ते पुढील 30 दिवस सुरू राहणार असल्याने या कालावधीत मुंबई शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरात 15 टक्के पाणीकपात होणार आहे. यासोबतच ठाणे शहरातही ही वजावट लागू होणार आहे.

 

हे सुद्धा वाचा : ठाणेकरांनी पळविले मुंबईचे पाणी; वागळे इस्टेट बोगदा कांड : जितेंद्र आव्हाड

राज्यातील पाणी योजनांना आता इलेक्ट्रोक्लोरिनेशनची साथ

सकाळी रिकाम्या पोटी लिंबूपाणी पिल्याने होतात अनेक फायदे ! जाणून घ्या एका क्लिकवर

मुंबई शहर आणि उपनगरांना पुरवल्या जाणाऱ्या एकूण पाण्यापैकी सुमारे 65 टक्के पाणी भांडुप जलशुद्धीकरण केंद्रातून प्रक्रिया केली जाते, असे बीएमसीच्या अधिकाऱ्याने सांगितले. या प्लांटला 75 टक्के पाणीपुरवठा हा 5,500 मिमी व्यासाच्या 15 किमी लांबीच्या पाण्याच्या बोगद्याद्वारे होतो. ठाण्यात बोअरवेल खोदल्यामुळे हा जलबोगदा खराब झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. पाण्याची गळती दुरुस्त करण्यासाठी पाण्याचा बोगदा पूर्णपणे बंद करणे आवश्यक असून, यादरम्यान हे पाणी पर्यायी वाहिन्यांद्वारे भांडुप जलशुद्धीकरण केंद्राकडे वळवले जाणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी