36 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमुंबईशिवभक्तांना शिवनेरीवर येण्यापासून मज्जाव का करता? संभाजी राजेंनी शिंदे-फडणवीस सरकारला सुनावले

शिवभक्तांना शिवनेरीवर येण्यापासून मज्जाव का करता? संभाजी राजेंनी शिंदे-फडणवीस सरकारला सुनावले

आज १९ फेब्रुवारी… हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, रयतेच्या राजाचे दर्शन घेण्यापासून खुद्द शिवभक्तांना मज्जाव करण्यात आला. कारण जनतेने निवडून दिलेल्या राजांचे गडावर आगमन झाले होते. फाटक्या माणसालासुद्धा छत्रपतींसमोर आपले गाऱ्हाणे मांडता येत होते. पण राजकीय स्वार्थापोटी उठताबसता छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेणाऱ्या राजकारण्यांचे शिवाजी महाराजांबद्दलचे प्रेम किती उथळ आहे, हे आज पुन्हा सिद्ध झाले आहे. अन्यथा छत्रपतींनी आखून दिलेल्या आदर्शांची अशी पायमल्ली झालीच नसती, अशी भावना शिवभक्तांकडून व्यक्त होत आहे. (Why do you stop Chatrapati Shivaji maharaj devotees from coming to Shivneri)

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. मात्र, यावेळी शिवभक्तांना गडावर येण्यास अटकाव करण्यात आला. त्यामुळे माजी खासदार आणि स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. यावर देवेंद्र फडणवीस यांनी यापुढे शिवभक्तांची अडवणूक होणार नसल्याचे सांगितले. “भविष्यात याबाबत योग्य ते नियोजन करण्यात येईल. पुढच्या वर्षी अशाप्रकारे कोणाचीही अडवणूक होणार नाही यासाठी नियोजन करू,” अशी ग्वाही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणूनच आज आपण हे स्वातंत्र्य पाहतो आहोत आणि आज मानाने जगतो आहोत. म्हणूनच दरवर्षी आपल्या या देवाचा, आपल्या राजाचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण येत असतो.”

यावेळी शिंदे-फडणवीस सरकारने सगळ्या डीपीडीसीमध्ये प्रतिवर्षी ३ टक्के निधी गडकिल्ल्यांसाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. सरकार जो निधी देते त्याव्यतिरिक्त हा निधी राखून ठेवला जाणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी निधी उपलब्ध होईल, असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

हे सुद्धा वाचा

२०२३ च्या मध्यावर मोदींचा राजीनामा ; न्यायमुर्ती, राजकारणी, उदयगपतींवर ‘पेगासस’ची हेरगिरी

मुंबई विद्यापीठाच्या राजाबाई टॉवरवर दिसली शिवशंकराच्या डोक्यावरील चंद्रकोर

निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शिवसेना आमदाराचा इशारा…

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी