29 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeमुंबईमहिला आयोगाच्या कार्यालयाचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारासाठी गैरवापर: संध्या सव्वालाखे

महिला आयोगाच्या कार्यालयाचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारासाठी गैरवापर: संध्या सव्वालाखे

महिलांवर होणार्‍या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी तसेच महिलांच्या हक्कासाठी महिला आयोग काम करत असते. परंतु महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या कार्यालयाचा वापर आता राजकीय कार्यक्रमासाठी केला जात असून महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali chakankar) या आयोगाच्या कार्यालयातूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचे काम करत आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे (Sandhya Savalakhe) यांनी केली आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे म्हणाल्या की, महिला आयोगाचे अध्यक्षपद हे संवैधानिक पद आहे, महिला आयोगाच्या कार्यालयातच आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकरणकर यांनी पक्ष प्रचाराचे काम करून पदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे.(Women’s Commission office misused for NCP’s campaign: Sandhya Savalakhe)

पक्ष प्रचाराचे काम वरिष्ठाच्या दबावाखाली करावे लागत आहे का, हे रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले पाहिजे.चाकणकर या दडपणाखाली पक्ष प्रचाराचे काम करत असतील तर ते अयोग्य व चुकीचा पायंडा पाडणारे व असंवैधानिक आहे. महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी जे कार्यालय आहे त्या कार्यालयातून राजकीय प्रचाराचे काम व्हायला नको. याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करून रुपाली चाकरणकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत असल्याचे संध्याताई सव्वालाखे यांनी स्पष्ट केले.

युवा आणि महिला देशाच्या राजकारणात सक्रिय असायला पाहिजे. ही काँग्रेसची कायम भूमिका राहिली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये देखील युवा आणि महिलांना उमेदवारी देण्याचा मानस असणार आहे. महिला आयोग स्ठापनेपासूनच महिलांसाठी काम करत आहे. राष्ट्रीय महिला आयोगाचा उद्देश देशातील महिलांचे हक्क, त्यांच्या समस्या आणि चिंता यांना आवाज देणे आणि त्यांचे संरक्षण करणे हा आहे. यात कौटुंबिक, राजकीय, धार्मिक आणि नोकरी संदर्भात महिलांच्या मुद्द्यावर जागरुकता निर्माण करतं. हिंसा आणि बलात्कार पीडित महिलांना न्याय आणि पुनर्वसनासाठी काम करतं.महिलांच्या संरक्षणासाठी संविधान आणि इतर कायद्यांतर्गत अनेक प्रकरणांची चौकशी करण्याचे दिवाणी न्यायालयाचे अधिकार आयोगाला देण्यात आले आहेत. आयोग महिलांसाठी संविधानिक आणि कायदेशीर संरक्षणांचा आढावा घेतो आणि सुधारात्मक विधायी उपायांची शिफारस करतो. हे महिलांना प्रभावित करणाऱ्या सर्व धोरणात्मक बाबींवर सरकारला सल्ला देते. आयोग महिलांचे आर्थिक सशक्तिकरण, लैंगिक जागरुकता, स्त्री भ्रुण हत्या आणि महिलांविरुद्ध बाबींवर जन अभियान राबवून त्यांच्या तक्रारी जाणून घेतात. हे तुरुंग, रिमांड होम, जिथे महिलांना कोठडीत ठेवले जाते, इत्यादींची तपासणी करते आणि आवश्यक तिथे कारवाई करण्याचे आवाहन करते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी