33 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeराजकीयनागपूरमध्ये कोण बाजी मारणार???

नागपूरमध्ये कोण बाजी मारणार???

टीम लय भारी

नागपूर आणि अकोला-बुलडाणा-वाशिम मतदारसंघाच्या विधानपरिषदेच्या जागांसाठी आज मतमोजणी होणार आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी थेट लढत या दोन्ही जागांवर होणार आहे. या निवडणुकीत काही चमत्कार होणार की अपेक्षित निकाल लागणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे(Nagpur: Counting of votes for Legislative Council seats will be held today)

विशेषत: नागपूरच्या निकालाकडे राज्याचे लक्ष .विधान परिषदेच्या नागपूर येथील जागेच्या निकालाकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत. कारण, या जागी मतमोजणीच्या अवघ्या काही तासांपूर्वी काँग्रेसने आपल्या उमेदवाराला सोडून अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला.

उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारची पाठ थोपटली

प्रकाश आंबेडकर यांची पुन्हा दमदार एंट्री

काँग्रेसने शेवटला क्षणाला आपले अधिकृत उमेदवार रवींद्र भोयर यांना बाजूला करून अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना समर्थन दिले त्यामुळे या निवडणुकीत चुरस वाढली. या निवडणुकीत भाजपने चंद्रशेखर बाबनकुळे यांना उमेदवारी दिली होती.

भाजपने चंद्रशेखर बावनकुळे यांची उमेदवारी घोषित केल्यानंतर मोठ्या घडामोडी घडल्या. बावनकुळे यांच्या उमेदवारीच्या घोषणेनंतर भाजपात धुसफूस सुरू झाली होती. भाजपचे नगरसेवक छोटू भोयर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवली.

खासदार इम्तियाज जलील यांची सरकारला ऑफर, मुस्लिम आरक्षण दिलं तर महापालिका निवडणुका लढणार नाही!

PM Narendra Modi witnesses Ganga ‘aarti’ onboard cruise, conducts midnight inspection of development works in Varanasi

मात्र,  मतदानाच्या १२ तासांआधी नागपुरात काँग्रेसने छोटू भोयर यांचा पाठिंबा काढून घेतला आणि अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा दिला. फाटाफूट होऊ नये यासाठी भाजपने आपल्या नगरसेवकांना नागपूरमधून बाहेर नेले होते. भाजपने या निवडणुकीत विजयाचा दावा केला आहे. तर, दुसरीकडे काँग्रेस नेत्यांनी चमत्कार होणार असल्याची भविष्यवाणी केली आहे. मतांच्या आकडेवारीनुसार भाजप विजयी होण्याची शक्यता आहे.

या मतदारसंघात महाविकास आघाडीकडे काँग्रेस 190, शिवसेना तर राष्ट्रवादी कॉंग्रेस 76 असे एकूण 396 मते आहेत तर 130 तर भाजपाकडे 244 मते आहेत. दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांकडे स्पष्ट बहुमत नाही. या स्थानिक स्वराज्य संस्थेत वंचित बहुजन आघाडीचे 85 तर अपक्ष 171 असे एकूण 256 मतदार आहेत. हे मतदार आपल्या विजयाचा ‘ जॅकपॉट’ बनू शकतात असा समज उमेदवारांना येताच त्यांनी या मतदारांची मनधरणी सुरू केली असल्याची चर्चा आहे.

विधान परिषद निवडणूकीसाठी अकोला,वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यातील 22 मतदानकेंद्रावर मतदान घेण्यात आले.तिन्ही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य असलेल्या 822 मतदारांपैकी 808 मतदारांनी आपला मतदानाचा हक्के बजावला.बाजोरिया निवडून आले तर बाजोरियांचा हा चौथ्यांदा विजय ठरेल.

जर बाजोरिया यांचा पराभव होऊन वसंत खंडेलवाल यांचा विजय झाला तर पाहिल्यांदाच विधान परिषद मध्ये कमळ फुलेल असल्याने यात कोण बाजी मारते याकडे सर्वांचे कक्ष लागले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी