28 C
Mumbai
Sunday, September 3, 2023
घरराष्ट्रीयभाजपच्या फेक न्यूजना काँग्रेस देणार चोख उत्तर; मुंबईतून ठेवणार नजर !

भाजपच्या फेक न्यूजना काँग्रेस देणार चोख उत्तर; मुंबईतून ठेवणार नजर !

सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधी पक्षांच्या नेत्यांची बदनामी करणे, खोटी माहिती पसरवून समाजाची दिशाभूल करणे, अशी कामे भाजप करत आहे. भाजप समाजमाध्यमांचा दुरुपयोग करत ‘फेक न्यूज’ही ससरवत असतो. त्यांचा हा प्रपोगंडा हाणून पडण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने अत्याधुनिक वॉर रुमची स्थापना केली असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते टिळक भवन येथील ‘भारतरत्न राजीव गांधी सोशल मीडिया सेंटर’चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान,विलास मुत्तेमवार, अतुल लोंढे आदी उपस्थित होते.
हे सुद्धा वाचा 
एक फुल, दोन हाफ…. कुणाला म्हणाले उद्धव ठाकरे!
Happy Birthday इशांत शर्मा | क्रिकेटशिवाय इशांतला आवडतात ह्या गोष्टी..
संरपंचाने पेटवली स्वत:ची कार; मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जचा नोंदवला निषेध

काँग्रेस सोशल मीडिया महाराष्ट्राचे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार यांच्या नेतृत्वात काँग्रेसची ही सोशल मीडिया टीम काम करणार आहे. या सोशल मीडिया केंद्रात स्टुडिओ तयार करण्यात आलेला आहे. तसेच अत्याधुनिक सॉफ्टवेरअयुक्त उपकरणे आहेत. या सर्व यंत्रणा कार्यान्वित करण्याकरिता अत्यंत कुशल तंत्रज्ञानस्नेही सोशल मीडिया टीम सज्ज करण्यात आलेली आहे. राहुल गांधी व खर्गे यांनी या केंद्राची पाहणी करुन सोशल मीडिया यंत्रणेचे कौतुक केले.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधनी सुरु केली आहे. भाजपला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसने सोशल मीडियावर देखील आता तयारीनिशी लढण्याचे धोरण आखले आहे. त्या दृष्टीने सुसज्ज अशी वॉर रुम मुंबईतील काँग्रेसच्या कार्यालयात उभारण्यात आली आहे. या वॉर रुममधून भाजपच्या दाव्यांना काँग्रेस प्रत्युत्तर देणार आहे. भाजपविरोधात लढण्यासाठी सोशल मीडियाचा चांगला वापर केला जाणार आहे.

काँग्रेसने भारत जोडो यात्रेनंतर सोशल मीडियावर आपला जोरदार प्रचार सुरु केला आहे. त्याच अनुशंगाने आगामी निवडणुका लक्षात घेता, आरोपांना प्रत्युत्तर देणे, मतदारांपर्यंत आपली भूमिका पोहचविण्याचे देखील काम सोशल मीडियाव्दारे केले जाणार आहे.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी