25 C
Mumbai
Thursday, February 22, 2024
Homeराष्ट्रीयहिमाचलप्रदेशमध्ये काँग्रेसला 40 जागांवर विजय; या उमेद्वाराचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत

हिमाचलप्रदेशमध्ये काँग्रेसला 40 जागांवर विजय; या उमेद्वाराचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत

हिमाचलप्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली असून काँग्रसने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. काँग्रेसने 40 जागावरं विजय मिळविला असून भाजपला 25 जागा मिळाल्या आहेत. तर तीन अपक्ष उमेदवारांचा विजय झाला आहे.

हिमाचलप्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली असून काँग्रसने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. काँग्रेसने 40 जागावरं विजय मिळविला असून भाजपला 25 जागा मिळाल्या आहेत. तर तीन अपक्ष उमेदवारांचा विजय झाला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये 12 नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान झाले होते. यावेळी 76.44 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. निवडणूक आयोगाच्या वेबसाईवरील आकड्यांनुसार हिमाचल प्रदेशच्या 68 जागांच्या निवडणुकीत काँग्रेसला 40 जागा, भाजपला 25 जागा आणि अपक्षांना तीन जागांवर विजय मिळाला आहे. तर आम आदमी पक्षाला या निवडणुकीत एकही जागा जिंकता आलेली नाही. हिमाचल प्रदेशच्या निवडणुकांचा इतिहास पाहता येथे 1985 सालापासून जनतेने कधीही एका पक्षाला सलग दुसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्याची संधी दिलेली नाही.

निवडणुकीचे निकाल पाहता सरोज विधानसभा क्षेत्रात मुख्यमंत्री जयराम ठाकून यांनी काँग्रेसच्या चेतराम यांचा पराभव केला आहे. माजी केंद्रीय मंत्री यांचे सुपुत्र आणि भाजपचे उमेदवार असलेले अनिल शर्मा यांना मंडी विधानसभा क्षेत्रातून मतदारांनी निवडून दिले आहे. अनिल शर्मा यांनी काँग्रेसचे उमेद्वार चंबा ठाकूर यांचा 10 हजारहून अधिक मतांनी पराभव केला आहे. तर शिमला शहर विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसचे हरीश जनारथा यांनी भाजपचे उमेद्वार संजय सूद यांचा पराभव केला आहे. तर विरोधी पक्ष नेते आणि शिमला काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष कुलदीप राठोड यांनी विजय मिळविला आहेत तसेच माजी मंत्री सुधीर शर्मा यांना देखील मतदारांनी विजयाचा कौल दिला आहे.

जयराम ठाकूर माध्यमांशी बोलताना म्हणाले, भाजपची हिमाचल प्रदेशमध्ये 1 टक्क्यांहून कमी वोट शेअरने हार झाली. तर काँग्रेसने इतिहासात पहिल्यांदाच इतक्या कमी मताधिक्क्याने विजय मिळविला. मी मतदारांच्या मतांचा आदर करतो, आशा आहे की काँग्रेस लवकरच त्यांचा मुख्यमंत्री निवडेल आणि राज्याचा कारभार सुरू करेल.

हे सुद्धा वाचा
भारताच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात युवकांना विकसित भारत द्यायचा आहे; गुजरात निवडणुकीनंतर मोदींनी युवावर्गाचे मानले आभार

गुजरात निवडणुकीच्या निकालानंतर काय म्हणाले शरद पवार, उद्धव ठाकरे?

गुजरात : भाजप मोडणार सर्वाधिक जागांचा विक्रम, तर काँग्रेसचाही सर्वात कमी जागांचा विक्रम होणार!

तर हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे सुपुत्र आणि काँग्रेसचे नेते विक्रमादित्य सिंह यांनी शिमला ग्रामीणमधून विजय मिळविला आहे. या मतदार संघात भाजपचे रिवी कुमार मेहता मैदानात होते. त्यांना 13 हजार 860 मतांनी विक्रमादित्य सिंह यांनी पराभूत केले आहे. या जागेवर सहा उमेदवार रिंगणात होते. विक्रमादित्य सिंह यांचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहे. विक्रमादित्य सिंह यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की, नवे सरकार जनतेला दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करेल, तसेच माझी आई मुख्यमंत्री व्हावी अशी माझी इच्छा असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी